शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

पृथ्वीराज चव्हाणांनी दिले देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद; कराड तालुक्यात चर्चा

By प्रमोद सुकरे | Published: July 21, 2023 6:36 PM

कराडच्या विमानतळाबाबत फडणवीस सकारात्मक

कराड : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी काँग्रेसचे नेते आमदार अशोक चव्हाण यांनी राज्यातील २८ विमानतळांच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असून राज्यातील २८ विमानतळांसहकराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. अशी सकारात्मक भुमिका मांडली.त्याच्या उत्तरानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना भर सभागृहात धन्यवाद दिले. त्याचीच आज कराड तालुक्यात चर्चा सुरू आहे.फडणवीस म्हणाले,  यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे विमानतळांच्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या अडचणी पाहून त्या सोडवल्या जातील. तसेच हेलिपॅड देखील बनवण्यात येईल.अधिवेशनात विमानतळांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात एअरपोर्टची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. 

विमानतळाचा विषय महत्वाचा : चव्हाणउपमुख्यमणी फडणवीसांना धन्यवाद देताना  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपण कराडच्या  विमानतळाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणचे पहिले विमानतळ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कराड येथे याच करिता केले होते कि ते अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. कराडच्या विमानतळाला गावकऱ्यांचा विरोध नाही तर त्याला काही निधी पाहिजे. त्याबद्दल शासनाने बैठक लावली तर तो प्रश्न मार्गी लागेल. 

पतंगराव कदमांनी केली होती नाईटलँडिंगची सोयदिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून कराडचे विमानतळ सुरू झाले. मात्र या ठिकाणी फक्त दिवसाच विमान उतरू शकत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर तत्कालीन उद्योग मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी नाईटलँडिंग ची सोय केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण