आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून साळशिरंबे (ता.कराड ) येथे आमदार फंडातून दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून विष्णू मंदिर येथील मुख्य चौक, अण्णा पाटील यांच्या वाड्यासमोरील चौक व धनगरवाडा येथील श्री बिरोबा मंदिर चौक आदी कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. त्यावेळी चवरे बोलत होते. माजी सरपंच रवींद्र पाटील, सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
तानाजी चवरे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात सातारा जिल्ह्याला विशेषत: कराड दक्षिण मतदारसंघात झुकते माप दिले आहे. त्यानंतर आमदार म्हणूनही संधी मिळाल्यावर काम करतानाही पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला. त्यातूनच साळशिरंबे गावाच्या विकासासाठी झुकते माप दिले आहे. गावाच्या विकासात सातत्य ठेवत त्यांनी या परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक कामे मंजूर आहेत. त्यातील काही कामे सुरू असून, उर्वरित कामे लवकरच सुरू होतील.
फोटो ओळ
साळशिरंबे, ता. कराड येथे विष्णू मंदिरासमोरील चौकात कॉंक्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी रवींद्र पाटील, तानाजी चवरे, सुरेश पाटील आदी.
फोटो :15 pramod 01