शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

पाचवड बाजारपेठेला खासगी सावकारीचा विळखा

By admin | Published: December 15, 2015 10:35 PM

फिटता फिटेना कर्ज : वीस ते तीस टक्क्यांनी व्याज आकारून व्यापारी, जनतेची लूट

महेंद्र गायकवाड--पाचवड --वाई, सातारा व जावळी तालुक्याला जोडणाऱ्या आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर वसलेली पाचवडची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी स्थानिकांपेक्षाही परगावाहून आलेले व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांकडे काम करणारा कामगारवर्गही शेजारील गावा-गावातून तसेच परराज्यातून रोजीरोटीसाठी आलेला आहे. बाजारपेठेमध्ये नव्याने आलेल्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा मोठ्या आहेत. व्यवसायाच्या गरजा भागविण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडे कर्जासाठी हेलपाटे मारून बेजार झालेल्या व्यापारी व त्यांच्या कामगारांना टार्गेट करून येथील बाजारपेठेत खासगी अनधिकृत सावकारी बोकाळली आहे. बाजारपेठेतील बरेच छोटे-मोठे व्यापारी या खासगी सावकारांच्या विळख्यात अडकले आहेत.पाचवड बाजारपेठेमध्ये फर्निचर, टिंबर मार्केट, हॉस्पिटल्स व हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायांमध्ये नव्याने आलेल्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. हे नवखे व्यावसायिक व त्यांना असलेली तातडीची आर्थिक गरज ओळखून हे खासगी सावकार त्यांना वीस ते तीस टक्क्यांनी पैसे पुरवून त्यांची गरज भागवतात. व्यापारीसुध्दा गरजेपोटी अशा रकमा घेतात; परंतु या पैशांचा परतावा करताना मात्र मेटाकुटीला येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपयांची परतफेड करताना सावकारास सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. एका हॉटेल कामगाराने माहिती दिली की, दोन वर्षांपूर्वी त्याने एका खासगी सावकाराकडून दहा हजार रुपये घेतले आहेत. आजपर्यंत त्याने पंचवीस हजार जमा करूनही मुद्दलीचे चार हजार रुपये वसुलीसाठी सावकाराने तगादा लावला असल्याचे सांगितले. सर्वसामान्य अशिक्षित जनतेबरोबरच सुशिक्षित वर्गही गरजेपोटी झटपट पैशांच्या मोहात या प्रकाराला बळी पडत आहे. गरजेपोटी खासगी सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या एका शिक्षकाने सांगितले की, पैसे देताना गोडी-गुलाबीने बोलणारे हे सावकार पैशांची वसुली करताना मात्र दंडेलशाहीचा वापर करतात. प्रसंगी मारहाण करून दामदुप्पट पैशाची मागणी करून ती वसूल करतात. अशा प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्यापर्यंतच्या धमक्याही दिल्याच्या घटना घडल्या आहेत. बँकांची भूमिकाही महत्त्वाची...पाचवडमध्ये राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका तसेच सहकारी पतसंस्था असतानाही व्यावसायिक व सर्वसामान्यांना खासगी सावकारीकडे का जावे लागत आहे, याचा या सर्व बँका आणि पतसंस्थेच्या जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये बोकाळलेल्या या खासगी अनधिकृत सावकारीपासून व्यावसायिक व सर्वसामान्यांना कशाप्रकारे मुक्त करता येईल, तसेच कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. गरजेपोटी घेतलेल्या पैशांवर वीस ते तीस टक्क्यांनी व्याजाने पैसे घेणारी खासगी सावकारी म्हणजे बाजारपेठेला लागलेली कीड आहे. सेंट्रल बँक ही राष्ट्रीयीकृत बँक असून बँकेने व्यावसायिक व सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या गरजा ओळखून वेगवेगळ्या शासनाच्या आर्थिक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांचा जनतेने फायदा घ्यावा. - आत्माराम शिंदे, मॅनेजर, सेंट्रल बँक शाखा, पाचवड पीडितांनी पुढे येण्याची गरज जे खासगी सावकारीला त्रासले आहेत, अशा पीडितांनी समाजासमोर पुढे येऊन याची खुलेआम चर्चा करणे गरजेचे आहे. समाजातील स्वत:च्या प्रतिष्ठेचा विचार न करता या अत्याचाराला तोंड फोडण्याची गरज असून प्रसंगी अशा खासगी सावकारांना कायद्याचा बडगा दाखविण्याची गरज आहे.