खांबांना वेलींचा विळखा
कऱ्हाड : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील खांबांना झाडवेलींनी विळखा घातला आहे. शहरातील भेदा चौक, कोल्हापूर नाका, पाटणकर कॉलनी परिसरात वीज वितरणच्या खांबांना झाडवेलींचा विळखा पडला आहे. या झाडवेलींना हटवण्याची मागणी लोकांतून होत आहे.
पुलाखाली कचरा
कऱ्हाड : कोल्हापूर नाका उड्डाण पुलाखाली कचरा साचला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुलाखाली शिल्लक अन्नपदार्थ टाकण्याबरोबरच इतरही कचरा टाकला जात असून, त्याचा नाहक त्रास परिसरातील व्यापारी तसेच प्रवाशांना होत आहे.
वाहतूक पोलिसांची गरज
कऱ्हाड : शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांची आवश्यकता आहे. नागरिकांतून वारंवार याबाबत मागणी होत आहे; मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
दूषित पाणी पुरवठा
कऱ्हाड : विद्यानगर परिसरात मुख्य रस्त्याकडेला ठिकठिकाणी रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. ते तसेच असल्याने खोदकामात नाल्यांतील दूषित पाणी जात आहे. नालालगतच पाण्याचे पाइप असून, दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.