शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

प्रचार थांबला; जोडण्या सुरू

By admin | Published: February 19, 2017 11:01 PM

उद्या मतदान : जि. प. ६४ गट, पं. स.च्या १२८ गणांत ‘हाय अलर्ट’

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी थांबला. जिल्ह्यातील ६४ गटांत तसेच १२८ गणांमध्ये राजकीय मंडळींसह प्रशासनाने हायअलर्ट ठेवला आहे. उद्या, मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यातील १९ लाख ६६ हजार ५८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ९ लाख ५२ हजार २३ स्त्रिया, १0 लाख १४ हजार ४८६ पुरुष व इतर ५ मतदारांचा समावेश आहे.निवडणुकीतील १९२ जागांसाठी ८१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ६४ गटांसाठी २८९ उमेदवार व पंचायत समितीच्या १२८ गणांसाठी ५३५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. जाहीर प्रचार थांबला असल्याने नेतेमंडळी, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. जिल्ह्यात ६४ गट व १२८ गणांसाठी २ हजार ५८४ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण दिले आहे. मतदान मशीनची तपासणीही काटेकोरपणे केली जात आहे. ाूक विभागाचा ‘वॉच’ आहे. सातारा तालुक्यात ३७८ मतदान केंद्रे आहेत. २ लाख ३२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जावळी तालुक्यातील १५० केंद्रांवर ८४ हजार ५१५ मतदार मतदान करतील. माण तालुक्यात १७३ केंद्रांवर १ लाख ४६ हजार ९३५, खटावात २५६ केंद्रांवर २ लाख १३ हजार ८२६, फलटणमध्ये २५१ केंद्रांवर २ लाख २२ हजार ४२८, कऱ्हाडात ४३४ केंद्रांवर ३ लाख ५१ हजार १७४, वाईत १५३ केंद्रांवर १ लाख २५ हजार ८०८, महाबळेश्वरात १०७ केंद्रांवर ३२ हजार ४७३, खंडाळ्यात १०५ केंद्रांवर ८७ हजार ३२०, कोरेगावात २१० केंद्रांवर १ लाख ७४ हजार १६४, पाटणमध्ये २ लाख ४७ हजार ६०२ इतके मतदार मतदान करणार आहेत.