सातारा : ‘चांगल्या कामाची पोहोचपावती मिळवायची असेल तर आधुनिक युगात प्रत्येक कामाचे व्यवस्थित ब्रँडिंग करणे महत्त्वाचे ठरणार आहे,’ असे मत निवेदिका स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.
सातारा येथील करंजेमधील शिक्षण प्रसारक संस्थेच्या हॉलमध्ये मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाळंक बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, स्कूल कमिटीच्या अध्यक्ष वत्सला डुबल, मुख्याध्यापक रवींद्र फडतरे, पर्यवेक्षक अमरसिंग वसावे आदी उपस्थित होते.
स्वाती महाळंक यांनी शैक्षणिक संस्थांनी आपली गुणवत्ता वाढविणे व आर्थिक स्त्रोत मिळविण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे ठरणार आहे, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर महाळंक यांनी प्रमाण भाषा, बोली व पुस्तकी भाषा याचे सुंदर वर्गीकरण करून स्पष्टीकरणही दिले. तसेच विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि भाषण कला विकसित करण्यासाठी विविध पैलूंची व व्यवसायातील संधीचीही माहिती दिली.
या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
......................................................