तांबवे, ता. कऱ्हाड येथील पूरग्रस्त भागाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, जिल्हा परिषद प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, सतीश पाटील, अशोकराव पाटील, सुनील पाटील, काकासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी जेष्ठ नेते दिवंगत पी.डी. पाटील, डॉ. डी.के. पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी तांबवे ग्रामपंचायतीस भेट दिली. पुरामुळे पुलाच्या झालेल्या दुरवस्थेची त्यांनी पाहणी केली. त्या वेळी झालेल्या चर्चेनंतर नवीन पुलावरून अनेकदा पाणी गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर आमदार चव्हाण यांनी नवीन पुलाचा प्रस्ताव द्या, अशा सूचना केल्या. गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे असून गाव मोठे असल्याने आरोग्य केंद्राचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी सांगितले.
फोटो : १०केआरडी०१
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथील पूरग्रस्त भागाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली.