शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक! 'दीनानाथ'ने गरीब रुग्णांचा ३० कोटींचा निधी वापरलाच नाही; चौकशी अहवालातून माहिती उघड
2
मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही
3
अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा
4
एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण
5
पॅट पेपरफुटीप्रकरणी १२ युट्युब चॅनेलवर कारवाई
6
८० कॉलेजांवर विद्यापीठाचा बडगा; महाविद्यालय विकास समिती स्थापण्यात कुचराई
7
GT vs RR : आधी 'साईची कृपा'; मग प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! विजयी 'चौकार' मारत गुजरात टायटन्स टॉपला
8
धारावीतल्या विहानची सुवर्ण कामगिरी; थायलंडमधील स्पर्धेत सहा पदकांची लयलूट
9
“शरद पवारांना कालही दैवत मानत होतो अन् आजही मानतो, परंतु...”; अजित पवार नेमके काय म्हणाले?
10
तहव्वूर राणा प्रत्यार्पण: हालचालींना वेग; अजित डोवाल-जयशंकर यांनी घेतली अमित शाह यांची भेट
11
त्यांना ५ कोटींचा खासदार निधी मिळतो; सुप्रिया सुळेंचे उपोषण म्हणजे फक्त स्टंटबाजी - अजित पवार
12
'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना
13
विजय मल्याला झटका; दीर्घ लढाईनंतर भारतीय बँकांचा विजय, ब्रिटनमधील मालमत्ता जप्त होणार
14
शेवटी बापच! पोहता येत नसताना शेततळ्यात उडी घेऊन मुलाला वाचवले, पण स्वतः मात्र बुडाला
15
“देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे
16
“संजय नेहमी आंधळ्या धृतराष्ट्रासोबत असायचा, म्हणजे उद्धव ठाकरे...”; शिंदेसेनेचा खोचक टोला
17
“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका
18
Jofra Archer Bowled Shubman Gill : गिलच्या विकेटची जोफ्रानं आधीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल
19
चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार
20
ट्रम्प इफेक्ट! पाकिस्तानी आयफोन घेताना रडणार; किडनीच काय घरदार विकले तरी...

साताऱ्यात रिल्स स्टार तरुणीकडून वेश्या व्यवसाय, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:40 IST

सातारा : सोशल मीडियावरील तथाकथित रिल्स स्टार असलेल्या एका तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने सुरू केलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांनी ...

सातारा : सोशल मीडियावरील तथाकथित रिल्स स्टार असलेल्या एका तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने सुरू केलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सातारा तालुका पोलिस ठाण्यात तीन तरुणांसह एका रिल्स स्टार तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ७) रात्री साडेदहा वाजता खिंडवाडी-सोनगाव रस्त्यावर करण्यात आली.गणेश मनोहर भोसले (२६, रा. कोरेगाव), ईश्वर सुभाष जाधव (३०, रा. विलासपूर, सातारा), वीरेंद्र महेंद्र जाधव (२१, रा. सदर बझार, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, तर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका रिल्स स्टार तरुणीचा समावेश आहे.रिल्स स्टार असलेली एक तरुणी तीन तरुणांच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करत होती. तसेच सोशल मीडियावर असलेल्या फाॅलोअर्सचा उपयोग हा वेश्या व्यवसायासाठी करून गिऱ्हाईक मिळवून त्यांना मुली पुरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून कारवाईसाठी पाठविले. त्यावेळी वरील तिघांना पोलिसांनी अटक केली, तर संबंधित रिल्स स्टार महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली.संबंधित रिल्स स्टार तरुणीने तसेच तिघा तरुणांनी आपापसात संगनमत करून दोन तरुणींकडून वेश्या व्यवसायाचा मोबदला स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वीकारला. तसेच वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून पीडित तरुणींना वेश्या व्यवसायासाठी त्यांनी प्रेरणा दिली. या सर्व संशयितांकडून पोलिसांनी १३ हजार ५०० रुपयांची रोकड, दोन मोबाइल, दोन दुचाकी असा २ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, सहायक फाैजदार रामचंद्र गुरव, मोना निकम, पंकजा जाधव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, क्रांती निकम आदींनी या कारवाईत भाग घेतला.ध्वनिफितीमुळे पुरावे सापडलेकाही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ध्वनिफीत व्हायरल झाली होती. त्या ध्वनिफितीमध्ये वेश्या व्यवसाय करणारी महिला व पुरुष ग्राहकाचे संभाषण आहे. हे संभाषण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस