शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे

By admin | Published: December 31, 2015 10:44 PM

मीराताई आंबेडकर : कऱ्हाडला महाविहार केंद्राचे उद्घाटन

कऱ्हाड : ‘बौद्ध लेण्यांकडे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे झाली असून, ती सरकारने हटवून या लेण्यांना संरक्षण द्यावे. बौद्ध लेण्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यानंतर या परिसरात पायाभूत सुविधा देण्याकडे सरकारने लक्ष द्यावे,’ अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी केली. दरम्यान, कऱ्हाडात अत्याधुनिक सुविधानियुक्त साकारत असलेले महाविहार हे आदर्शवत संस्कार केंद्र असून, त्यास धम्म दान देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा शाखेच्या वतीने कऱ्हाड येथे कऱ्हाड-तासगाव रोडवरील महाविहारामध्ये आयोजित सोळावी भव्य धम्म परिषद व दीक्षा समारंभ व महाविहार हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष व्ही. आर. थोरवडे होते. चैत्यभूमी मुंबई येथील भन्ते दीपंकरजी, राष्ट्रीय सचिव एन. एम. आगाणे, प्रभाकर जाधव, वि. म. रूपवते, अलकाताई टेकाळे, मधुकर भोसले, समता सैनिक दलाचे मेजर दादासाहेब भोसले, रूपेश तामगावकर, सुदाम ढापरे, दिलीपराव थोरवडे, अरुण गायकवाड, व्ही. एस. गायकवाड, राजेंद्रकुमार काकडे, कांताताई डोंगरे, शोभाताई कांबळे, डॉ. मीना इंजे, डॉ. प्रल्हाद इंजे, महेश लोखंडे उपस्थित होते. यावेळी कऱ्हाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिराताई आंबेडकर यांनी अभिवादन केले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.मिराताई आंबेडकर म्हणाल्या, ‘धार्मिक कार्यात सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन हा धम्म कार्याचा रथ पुढे नेला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या शाखा प्रत्येक गावात तरुणांनी काढाव्यात आणि समता सैनिक दलाची शिबिरे घेऊन समाजाचे सैनिक तयार केले पाहिजेत.’ विविध मागण्यांचे ठराव या परिषदेत करण्यात आले. (प्रतिनिधी)