शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Kaas plateau: कास पठार घेणार मोकळा श्वास!, संरक्षक जाळ्या काढण्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 3:28 PM

वन्यप्राण्यांपासून फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होताना दिसत होते

सागर चव्हाण

पेट्री : शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील तारेची संरक्षक जाळी काढण्याचे काम सुरू असल्याने कास पठार आता मोकळा श्वास घेणार आहे. याचा फायदा फुलांच्या हंगामात दुर्मीळ फुलांच्या वाढीसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावर दरवर्षी फुलांच्या हंगामात विविधरंगी तसेच दुर्मीळ फुले फुलतात. दरम्यान हा फुलोत्सव पाहण्यासाठी जिल्हा, राज्य, देश-विदेशातून लाखो पर्यटक कास पठाराला भेट देत असतात. गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होतानाचे चित्र दिसत असल्याने वन्यप्राणी तसेच गाई, गुरे मुक्तपणे संचार करून शेणखत उपलब्ध झाल्यास तसेच या प्राण्यांचा वावर मुक्तपणे सर्वत्र पठारावर असल्यास फुले फुलण्याच्या प्रमाणात वाढ होईल. संरक्षक जाळी हटविली जावी, यासाठी अनेकांनी आपले मत व्यक्त केले होते.तसेच जाळी बसविल्यापासूनच ‘लोकमत’नेही या संरक्षक जाळ्या बसविण्याला प्रखर विरोध केला होता. दरम्यान तेव्हाच संरक्षक जाळ्या हटविल्या असत्या तर आज फुलांचे अत्यल्प प्रमाण पाहायला मिळाले नसते असे अनेक पर्यटकांनी मत व्यक्त केले. पठारावरील फुलांचे प्रमाण कमी होण्यामागे अति पाऊस हे जरी कारण पुढे येत असले तरी ते निसर्गतः आहे. निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही; परंतु प्राण्यांचा मुक्त संचार पठारावर झाल्यास फुले फुलण्याचे प्रमाण निश्चित वाढू शकेल. ही उपाययोजना आपल्या हातात असून, याचा निश्चितच फायदा येथून पुढे फुलत्या फुलोत्सवावरून पाहावयास मिळेल, असे मत व्यक्त केले जात आहे. तसेच फुलांच्या हंगामात वर्दळ वाढून फुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरुपात संरक्षक जाळीची सोय केली जाणार असल्याचे सांगितले. 

कुमुदिनी परिसरात फुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामानाने इतरत्र रस्त्यालगत फुलांचे प्रमाण कमी असल्याने गुरे सर्वत्र चरणे आवश्यक आहे. परिसरात गुरांचे प्रमाण वाढून गुरे चारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याचा फायदा फुलांच्या वाढीवर नक्कीच होईल. -सचिन पवार, सातारा, पर्यटककास पठार समिती व वनविभागामार्फत संरक्षक जाळी लावण्यात आली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या जाळीचा दुष्परिणाम फुलांच्या हंगामावर होत असल्याने आजपासून जाळी काढण्याचे काम सुरू आहे. आता वन्यप्राण्यांसाठी पठार परिसर मोकळा होत असून, पुढील फुलांचा हंगाम पूर्वीप्रमाणे येईल, अशी अपेक्षा आहे. हंगाम काळात फुलांच्या संरक्षणासाठी तात्पुरती जाळी बसवली जाणार आहे. - रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारforest departmentवनविभाग