शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

तुटक्या संरक्षक भिंतीला नायलॉन दोरीचे संरक्षण

By admin | Published: October 10, 2016 11:54 PM

पाहावं ते नवलच : कोटेश्वर पुलावरील प्रवास ठरतोय धोकादायक

सातारा : साताऱ्यातील कोटेश्वर पुलावरील संरक्षक कठडा पालिकेच्या वतीने तोडण्यात आला असून, या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या कठड्याजवळ बॅरिकेट्स उभारण्याऐवजी चक्क नायलॉनची दोरी बांधून संरक्षण देण्यात आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोटेश्वर पुलाशेजारी असणारा संरक्षण भिंतीचा कठडा काही दिवसांपूर्र्वी सातारा नगरपालिकेने ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी जेसीबीद्वारे तोडला गेला़ हा तोडलेला कठडा गेले अनेक दिवसांपासून त्याच अवस्थेत असल्याने नागरिक तसेच वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ विशेषत: शाहूपुरीकडून उताराने भरधावपणे येणाऱ्या वाहनांना यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध नागरिकांची या पुलावरून सतत ये-जा सुरू असते़ रात्रीच्या वेळी या परिसरात अनेक ठिकाणी असणारे दिवे बंद असतात़ यामुळे हा धोका अधिक जाणवत आहे़ नागरिकाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सातारा नगरपालिकेने उदासीनतेची भावना दूर ठेवून नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्यक्रम दिले पाहिजे. या समस्येबाबत तातडीने कार्यवाही झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)स्वार्थापोटी पुलाचे काम रेंगाळलेकोटेश्वर पुलाच्या रुंदीकरण व संरक्षण भिंतीबाबत या परिसरातील नागरिकांनी अनेकदा लेखी निवेदन व तक्रारी पालिकेकडे केल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते़ राजकीय हेवेदावे व स्वार्थापोटी या पुलाचे काम रेंगाळले आहे़ नागरिकांच्या सुरक्षितेबाबत संबंधित विभागाने प्राधान्यक्रम द्यावा, ऐवढीच अपेक्षा नागरिकांची आहे़ दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे.- श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ता