शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

अध्यक्षांची प्रकृती खालावली; आंदोलनस्थळीच सलाईन; साताऱ्यात संगणक परिचालकाचे उपोषण सुरुच

By नितीन काळेल | Published: January 24, 2024 6:42 PM

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आंदोलनस्थळी..

सातारा : राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण झाले तरीही शासनदरबारी हालचाली नाहीत. तर राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांचे उपोषण सुरूच आहे. बुधवारी त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धारच त्यांनी केला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा. कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.दि. १६ जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. तरीही शासनस्तरावर मागण्यांबाबत काहीही निर्णय झालेला नाही. तसेच अधिकाऱ्यांकडूनही काहीही सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत. आतापर्यंत विविध राजकीय संघटना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तर संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुनीता आमटे यांचे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे बुधवारी दुपारच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यानंतर आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आंदोलनस्थळी..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी यात्रेसाठी दोन दिवस आले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संगणक परिचालक संघटनेचे शिष्टमंडळ दरे येथे गेले आहे. बुधवारी दुपारपर्यंततरी मुख्यमंत्र्यांशी मागण्यांबाबत चर्चा झाली नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. तर माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांची पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी बुधवारी दुपारी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी उपोषणकर्त्या सुनीता आमटे यांच्याशी चर्चा केली. तसेच मागण्यांबाबत आम्ही सोबत असल्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन काही सूचनाही केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदagitationआंदोलन