शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

साताऱ्यात असंघटीत बांधकाम कामगारांचा आक्रोश मोर्चा

By नितीन काळेल | Published: October 19, 2023 6:58 PM

घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनसची मागणी 

सातारा : सातारा जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांनी गुरुवारी घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मिनाक्षी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघाला. पोवई नाक्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माेर्चा आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.असंघटीत बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज निकाली काढून मंजूर करुन घ्यावेत, आॅनलाइन अर्जात चुकीच्या व मनमानी पध्दतीने त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्ज नामंजूर केले जात आहेत. नामंजूर अर्ज लवकरात लवकर मंजूर करावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून पुरविले जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अत्यंत खराब अन्न पुरविले जाते. त्यामुळे ही योजना बंद करुन त्या बदल्यात कामगारांना कोरडा शिधा पुरवावा किंवा एक हजार रुपये द्यावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार बोनस देण्यात यावा, सातारा जिल्ह्यातील हजारो बेघर कामगारांना स्वत:चे घर बांधण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करुन द्यावी. ६० वर्षांवरील कामगारांना तत्काळ पेन्शन योजना सुरू करावी, सातारा जिल्हा बांधकाम कामगार मंडळाच्या कामगार आयुक्तालयातील सर्व पदे भरुन गैरसोय टाळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात योगेश पोळ, भानुदास डाईंंगडे, नंदा चोरगे, नीलेश मोरे, आदर्श खाडे, संगिता साळुंखे, राहुल खरमाटे, सदाशिव खाडे, वनीता सुर्वे, स्वाती गादेकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन