कोपर्डे हवेली : विद्युत कायदा २०२१ च्या विरोधात वीज वितरण कंपनीच्या संघटनेच्यावतीने सातारा येथील महावितरण सातारा सर्कल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी काॅ. नानासाहेब सोनवलकर, अविनाश खुस्पे, प्रशांत वाघ यांच्यासह तिन्ही कंपनीच्या संघटनेचे कर्मचारी अभियंते, पदाधिकारी उपस्थित होते.
वर्कस फेडरेशन, सबाॅर्डीनेट इंजिनिअर आसोशिएशन इंटक या तिन्ही संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभर निदर्शने करण्यात आली.
संसदेत पाऊसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. २०२१ चा नवीन कायदा पास झाला तर तिन्ही वीज कंपन्याचे खासगीकरण होणार आहे. त्यामुळे तिन्ही कंपन्याच्या संघटनेनी देशभर ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली. १० ऑगस्टला राज्यात संघटनेनी संप पुकारला आहे.
फोटो ओळ
सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या महावितरण सर्कल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नानासाहेब सोनवलकर, अविनाश खुस्पे, प्रशांत वाघ उपस्थित होते.