लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : सर्वसामान्यांच्या विकासात पायाभूत सुविधांचे योगदान महत्त्वाचे असते. रेल्वे ही पर्यावरणपूरक, स्वस्त वाहतूक सेवा आहे. रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सुविधा पुरविणार आहोत. तसेच शेतमालाच्या साठवणुकीसाठी ठिकठिकाणी वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असून, रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी व्यक्त केला. कराड येथे पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणाकरिता मध्य रेल्वे आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनबरोबर स्वाक्षरी करार, घोरपडीच्या वॉटर रिसायकलिंग प्लांटचे लोकार्पण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी, फलटण-पंढरपूर आणि जेऊर-आष्टी या नवीन मार्गांचे भूमीपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार संजय पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार नारायण पाटील, आमदार भारत भालके, सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, नीता केळकर, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा, राजीव अग्रवाल, मध्य रेल्वेचे एस. टी. गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रभू म्हणाले, पायाभूत सेवांच्या विकासामुळे सर्वसामान्यांच्या विकासाला गती मिळते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांच्या पायाभरणीचा प्रारंभ रविवारी झाला आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. या मार्गामुळे दोन्ही ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे ही सर्व किनारपट्टी उर्वरीत राज्यांशी जोडली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल कोकणात जाणार असून, शेतमालाला नवी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. देशातील वंचित घटकांचा, शेतकऱ्यांच्या विकासाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. या विकास कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे विशेष सुविधा पुरविणार आहे. कंटेनर कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या माध्यमातून शेतमाल साठवणुकीसाठी राज्यात विविध ठिकाणी वेअरहाऊस उभारण्यासाठी रेल्वे पुढाकार घेणार आहे. तसेच देशातील सर्व रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्याबरोबरच रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वेची ३०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. जलसंधारणाच्या कामाबरोबरच रेल्वे ५ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदाभाऊ खोत म्हणाले, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार असून, या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापाराला चालना मिळणार आहे. याचा थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सर्वश्री विजयसिंह मोहिते-पाटील, विनायक राऊत, संजयकाका पाटील, शेखर चरेगावकर यांची भाषणे झाली. कऱ्हाड रेल्वेस्थानकप्रमुख एम. ए. स्वामी यांनी आभार मानले. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी गौरवोद्गार माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा गौरव करीत प्रभू म्हणाले, चव्हाण यांचे नाव आजही देशात गौरवाने घेतले जाते. चव्हाण यांनी आजच्या व उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्य पाहिले ते या रेल्वेच्या विविध कामांच्या प्रारंभाने पूर्ण होताना दिसून येत आहे. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार संजयकाका पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, नीता केळकर, एकनाथ बागडी, रामकृष्ण वेताळ उपस्थित होते. १ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार महाराष्ट्रासह देशातील स्थानकांवर पुढील दहा वर्षांत पाच कोटी वृक्षलागवड करणार आहे. तसेच विद्युतीकरणही करण्यात येणार आहे. सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पही या ठिकाणी विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे वर्षाला रेल्वे १ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहे. या प्रकल्पांच्या कामांचा झाला प्रारंभ १) पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे विद्युतीकरण प्रारंभ २) कोल्हापूर-वैभववाडी नवीन रेल्वेलाईन कामाचे भूमिपूजन ३) हातकणंगले ते इचलकरंजी ८ किलोमीटर रेल्वेमार्ग कामाचे भूमिपूजन ४) फलटण-पंढरपूर १०५ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या कामाचे भूमिपूजन ५) घोरपडी येथे दीड कोटी रुपयांचा वॉटर वेस्ट रिसायकलिंग सयंत्र ६) जेऊर-आष्टी येथील ७८ किलोमीटर लांबीच्या
शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सुविधा पुरविणार
By admin | Published: June 12, 2017 1:16 AM