शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

वडूजमधील सार्वजनिक शौचालये हायटेक-: नगरपंचायतीची कचरामुक्तीकडे वाटचाल स्वच्छतेमध्ये आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:54 PM

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयामुळे वडूज शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देविविध सुविधांमुळे समाधान

वडूज : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयामुळे वडूज शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आघाडी घेतली आहे.

यामध्ये नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी नागरिक व नगराध्यक्ष, नगरसेवकांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील मुख्यालयातील वडूज शहराची स्वच्छतेकडे सुरू असलेली वाटचाल निश्चितच वाखणण्याजोगी ठरत आहे. शहर स्वच्छता समन्वयक रुचिरा खंडारे, नगराध्यक्ष महेश गुरव, बांधकाम सभापती वचन शहा, नगरसेवक प्रदीप खुडे, अभय देशमुख यांच्यासह शहरातील नागरिक नूतन शौचालय पाहणीदरम्यान उपस्थित होते. आरोग्य, ड्रेनेज विभागातील अधिकारी, कर्मचारी दक्ष राहत आहेत. तसेच काही महिन्यांपासून नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण आघाडी घेत शहर कुंडीमुक्त करण्याबरोबरच कचरा डेपोमुक्त करण्यात आला आहे.

स्वच्छतेबरोबर शहरातील नागरिककांकडे शौचालयांची व्यवस्था आहे का? सामुदायिक, सार्वजनिक शौचालये आहेत का? या बाबी ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अंतर्भूत असल्याने शहरात सामुदायिकसह सार्वजनिक ३९ शौचालये अत्याधुनिक सुविधांयुक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयमधील स्वच्छतागृहे ही यानिमित्ताने स्वच्छ दिसू लागले आहे.

स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थेसह डिस्पोजल मशीन ही बसविण्यात आले आहे. तसेच २४१ लाभार्थ्यांचे शौचालये नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारले आहेत.शहर ओडिएफप्लसप्लस होण्यासाठी वडूज नगरपंचायतीने कंबर कसली आहे. स्वच्छता गृहाबाहेर सूचनापेटी लावली आहे. शहरातील स्वच्छतागृहांच्या ठिकाणी लावलेल्या दिशादर्शक फलकावर शौचालयांच्या नावासह किती अंतरावर आहेत, याची नोंद केली आहे.सर्वसामान्यांतून समाधान व्यक्तशहरांमध्ये बाजार चौकात एक, नाथमंदिर परिसरात एक, कुंभारगल्लीत एक, इंदिरानगर व आदिनाथनगरमध्ये प्रत्येकी दोन, संजयनगर, दबडेवस्ती प्रत्येकी एक असे मिळून नऊ युनिट शौचालये अत्याधुनिक स्वरुपात उभारलेले आहे. वडूज शहरात स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

नागरिकांनी स्वच्छतागृहांचा वापर करण्याबरोबर स्वच्छतागृहांची काळजीही घेणे गरजेचे आहे. या सुविधा सर्वांसाठीच असल्याने त्याचा योग्य वापर करावा. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा असताना कोणीही उघड्यावर शौचविधी करू नये. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेऊयात, असे आवाहन केले.-रुचिरा खंडारे, समन्वयक 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर