शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सातारा जिल्ह्यात प्लास्टिक कारवाईचा ‘पंच’ सातारा पालिकेची मोहीम चौथ्या दिवशीही तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:23 PM

सातारा : प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून जिल्ह्यात या निर्णयाची प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मंगळवारी प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणाºया एकूण पाच व्यापाºयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये साताºयातील चार तर पुसेसावळी येथील एका व्यापाºयाचा समावेश आहे. संबंधितांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शासनाने जाहीर ...

ठळक मुद्देपाच व्यापाऱ्यांवर कारवाई : प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल;

सातारा : प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून जिल्ह्यात या निर्णयाची प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मंगळवारी प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणाºया एकूण पाच व्यापाºयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये साताºयातील चार तर पुसेसावळी येथील एका व्यापाºयाचा समावेश आहे. संबंधितांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अनेक व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी धास्ती घेतली आहे. पालिकेच्या आरोग्य पथकाकडून होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यापारी व दुकानदार स्वत:हून प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावत आहे. प्लास्टिक बंदी निर्णयाच्या पहिल्या दिवसापासून पालिकेच्या वतीने तपासणी व कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मंगळवारी आरोग्य पथकाने पोवई नाक्यावरील संदीप करपे यांच्या नीलकमल, शशिकांत गांधी यांच्या रुपसमीर, शगून शू मार्ट तसेच चकोर बेकरी या चार दुकानांवर कारवाई करून तब्बल १५ किलो प्लास्टिक कॅरिबॅग तसेच थर्माकॉल जप्त केले. या व्यापाºयांना पालिकेच्या वतीने प्रत्येकी पाच हजारांचा दंड करण्यात आला.या कारवाईत आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख राजेंद्र कायगुडे, आरोग्य निरीक्षक दत्तात्रय रणदिवे, आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव आदी सहभागी झाले.वाहनाला प्लास्टिक पिशवी, खिशाला बसली कात्रीसातारा : वाहनाला प्लास्टिक पिशव्या अडकवून साहित्य नेणाºया एका दुचाकीधारकाला प्लास्टिक बाळगणे चांगलेच महागात पडले. पालिकेच्या कर्मचाºयांनी राजवाड्यावर संबंधिताकडून ५ हजार रुपये दंड वसूल केला. सातारा शहरात प्लास्टिक पिशव्यांप्रकरणी दंडात्मक कारवाई सुरू आहे. राजवाडा परिसरात पालिकेच्या वतीने कारवाई सुरू असताना एक दुचाकी चालक आपल्या दुचाकीच्या हँडलला साहित्य ठेवलेल्या प्लास्टिक पिशव्या घेऊन निघाला होता. वाहतूक शाखेची पोलीस गाडी अडवून लायसन्स मागतात, हे चित्र आपण वेळोवेळी पाहतो; पण पालिका कर्मचाºयांच्या पथकानेच या दुचाकीला गराडा घातला.‘तुम्ही प्लास्टिक पिशवी बाळगली आहे. तुम्ही शासनाच्या अधिसूचनेचा भंग केला आहे. त्यामुळे ५ हजार रुपयांची पावती फाडायला लागेल,’ अशी सूचना पालिकेच्या अधिकाºयांनी केली. पिशवी जवळ ठेवली म्हणून ५ हजारांचा दंड भरण्याचा हा प्रकार ‘अति’च वाटल्याने संबंधित दुचाकी चालकाने दंड भरण्यास विरोध दर्शविला. पालिका अधिकारी व संबंधित दुचाकी चालकामध्ये बराचवेळ हमरी-तुमरी सुरू होती.‘जलमंदिर’वर फोन लावण्याची भाषा संबंधिताने केली. त्यावर ‘राजेंना आम्हीच फोन लावतो,’ असे कर्मचाºयांनी सांगताच दुचाकी चालक नरमला. अखेर पाच हजारांचा दंड घेऊनच दुचाकी चालकाला सोडण्यात आले. त्यामुळे वाहनाला प्लास्टिक पिशवी अडकवून बिनधास्त फिरणेही आता अंगलट येऊ शकते, याचा बोध येथे जमलेल्या अनेकांना झाला.पुसेसावळीतील कारवाईत ५० किलो पिशव्या जप्तपुसेसावळी : प्लास्टिक बंदी मोहीम काटेकरपणे राबविली जात असताना खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एका बेकरीवर कारवाई करण्यात आली. बेंगळूर बेकरीचे मालक बाळकृष्ण शेट्टी यांच्या बेंगळूर बेकरीतून तब्बल ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच शेट्टी यांच्याकडून पाच हजारांचा दंडही वसूल केला. या कारवाईत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एन. बी. माने, पुसेसावळीचे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोसले, सचिन कदम, अनिल कदम, महेश कांबळे, विजय नवगान, जगदीश त्र्यंबके, दिलीप काटे, प्रकाश कदम आदींनी सहभाग घेतला.फलटणमधून प्लास्टिक हद्दपार...१. मलटण : प्लास्टिक बंदी कायद्याच्या रुपात लागू झाली असून, फलटणकरांनी ती सकारात्मकपणे स्वीकारली आहे. प्लास्टिक बंदीचे चांगले परिणामही नागरिकांसह बाजारपेठेत जाणवू लागले आहेत. बाजारपेठेतून प्लास्टिक पिशव्या हद्दपार झाल्या असून, याची जागा आता कापडी व कागदी पिशव्यांनी घेतली आहे.२. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांसह मेडिकल दुकान, फळ विक्रेते, किराणा दुकान, सौंदर्य प्रसाधने आदी दुकानांमधून प्लास्टिकला रामराम करण्यात आला आहे. शहरातील काही हॉटेलमधून यूज अँड थ्रोचे ग्लास चहासाठी वापरले जायचे, आता ते ही हद्दपार झाले आहेत. पूर्वी पुष्पगुच्छ किंवा बुकेला प्लास्टिकच आवरण असायचं. आता या आवरणातून फुले मोकळी झाली आहेत. बेकरीमध्ये सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर व्हायचा, तोही पूर्णपणे बंद झाला आहे.कोरेगाव : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे सुरू केल्याने काही दिवसांतच प्लास्टिक हद्दपार झाले आहे. सोमवारी आठवडा बाजारादिवशी कापडी पिशव्यांचा बोलबाला होता. महिलांच्या हाती कापडी पिशव्या पाहावयास मिळत होत्या, बाजारात अनेकांनी कापडी पिशव्या विक्रीसाठी देखील ठेवल्या होत्या.

टॅग्स :SangliसांगलीPlastic banप्लॅस्टिक बंदी