शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अवकाळीमुळे पंचनाम्यांचाही ‘पाऊस’!

By admin | Published: March 02, 2015 11:39 PM

निसर्गाचा कहर : शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या शिवारात; प्रस्तावित नुकसान भरपाई मिळेना तोवरच नवीन संकटाचा घाला

सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. शेतकरी काबाडकष्ट करुन पिकांचे उत्पादन घेतात; परंतु ऐन काढणीच्या वेळी अथवा शेतकऱ्यांच्या हातात पैसा येण्याच्या वेळीच पाऊस कहर करत आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्या जातात. या फळबाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातले शेतकरी पुरते हादरुन गेले आहेत. ज्वारी, गव्हाच्या मळण्याही अद्याप रखडल्या आहेत. शेतात काढून टाकलेली पिके पावसाने भिजली आहेत. अजूनही पावसाचे चिन्ह कायम असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने एक रुपयाही दिला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आता पुन्हा अवकाळी पावसाने सुरुवात केली असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु झाले आहेत. त्यापैकी जावळी, वाई, महाबळेश्वर या तीन तालुक्यांती पंचनाम्यांचे अंदाजित अहवाल महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांती ३७८ शेतकऱ्यांच्या २७१.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. इतर तालुक्यांतही पंचनामे सुरु आहेत. मे २0१४ : बाधित शेतकरी ८८५, क्षेत्र २२३.६९ हेक्टर , नुकसान ५0.३९ लाख. जुलै २0१४ : बाधित शेतकरी १६, क्षेत्र ४.४ हेक्टर, नुकसान ६0 हजार. नोव्हेंबर २0१४ : बाधित शेतकरी १३३, क्षेत्र ४५.२७ हेक्टर, नुकसान १0.४६ लाख. डिसेंबर २0१४ : बाधित शेतकरी २,८३९, क्षेत्र ४४६.६४ हेक्टर, नुकसान ६७.३५ हजार. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदील झाला आहे. नुकसानीचे लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)खंडाळ्यात ५० लाखांचे नुकसान खंडाळा : खंडाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वत्रच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वर्षभरात तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आडवी झाली. शिवारातील उभ्या पिकावरच आभाळ कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खंडाळा तालुक्यातील सुमारे २३० हेक्टर क्षेत्रातील तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पण तरीही शेतकरी पुन्हा नव्या दमाने पाठीचा कणा ताठ करून काळ्या आईच्या सेवेत रममाण झालेला पाहायला मिळत आहे.आदर्कीत नुकसानीचे पंचनामेआदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या आदर्कीसह परिसरात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भुईसपाट झाली. रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी आदर्कीसह परिसरात नुकसानीचा पंचनामा केला.कोरगावात १०५० शेतकऱ्यांवर संकट कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सुमारे ४५० हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा तडाखा बसला असून १ हजार ५० शेतकरी बाधित झाले आहेत. ज्वारीचे ३५० हेक्टर, हरभरा ५५, द्राक्षे, १५ आंबा ५ तर डाळींबाचे पाच हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.