सातारा, दि. २९ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या तेराव्या समर्थ एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या ‘व्यक्ती’ संस्थेने सादर केलेल्या ‘प्रतिगांधी’ एकांकिकेने प्रथम क्रमांकासह ‘समर्थ एकांकिका’ बहुमान पटकावला. पुण्याच्या ‘आमचे आम्ही’ संघाने सादर केलेली ‘अगम्य’ दुसऱ्या पुरस्काराची मानकरी ठरली, तर सांगलीच्या राजेंद्र पोळ सांस्कृतिक प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘नथिंग टू से’ एकांकिकेस तिसरा क्रमांक मिळाला. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लेखक सचिन मोटे यांच्या हस्ते करण्यात आला. साताऱ्याच्या थिएटर वर्कशॉपने सादर केलेल्या ‘स्वातंत्र्याच्या काठावर’ आणि यूथ थिएटर संघाच्या ‘सावल्या’ एकांकिकांना उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिके देण्यात आली. ‘प्रतिगांधी’ एकांकिकेसाठी नवीन संहितेचे पारितोषिक धनंजय सरदेशपांडे यांना देण्यात आले. वेगळ्या प्रयोगासाठी देण्यात येणारे खास पारितोषिक ‘व्यक्ती’ संस्थेने सादर केलेल्या ‘क्लोन’ या मूक एकांकिकेस देण्यात आले. ‘समर्थ स्थानिक एकांकिका’ बहुमान ‘संवाद’ संस्थेच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ एकांकिकेस देण्यात आला. व्यक्तिगत पारितोषिके पुढीलप्रमाणे : दिग्दर्शन : प्रथम सुयश झुंझुरके (प्रतिगांधी), द्वितीय मनोज डाळिंबकर (अगम्य), तृतीय प्रताप सोनाळे (नथिंग टू से), उत्तेजनार्थ किरण पवार (सावल्या) आणि बाळकृष्ण शिंदे (स्वातंत्र्याच्या काठावरती). अभिनय (पुरुष) : प्रथम डॉ. अभय कुलकर्णी (नथिंग टू से), द्वितीय प्रणव जोशी (अगम्य), तृतीय प्रमोद खांडेकर (ब्रेन), उत्तेजनार्थ श्रेयस माडीवाले (क्रमश:), पंकज काळे (शोधला शिवाजी तर..), सुरेंद्र टेकाळे (भोत), सूरज बाबर (एक एप्रिल). अभिनय (स्त्री) : प्रथम दीप्ती जोशी (भोत), द्वितीय सुप्रिया गोसावी (अंतरंग), तृतीय मानसी कुलकर्णी (दि चेंज), उत्तेजनार्थ पायल पांडे (नथिंग टू से), प्रेरणा निगडीकर (स्वातंत्र्याच्या काठावरती), ऋचा भाटवडेकर (बे एके एक), अमृता ओंबाळे (ईश्वरसाक्ष). समर्थ उल्लेखनीय अभिनयाचे पारितोषिक श्रद्धा वुल्लेनवरू यांना ‘ब्रेन’ एकांकिकेसाठी देण्यात आले. नेपथ्य, प्रकाशयोजना : प्रथम किरण पवार (सावल्या), द्वितीय अमृता चौघुले (गारा), तृतीय रजनीकांत कदम (लव्ह). संगीत व ध्वनियोजना : प्रथम सुरेश भद्रे (ईश्वरसाक्ष), द्वितीय अजित साबळे (ब्रेन), तृतीय प्रतीक केळकर (भोत). रंगभूषा व वेषभषेचे प्रथम पारितोषिक ‘ईश्वरसाक्ष’, द्वितीय ‘डम डम डंबोला’ तर तृतीय पारितोषिक ‘क्रमश:’ एकांकिकेस देण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कोल्हापूरचे संजय हळदीकर आणि मुंबईच्या विजयश्री साखरे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभास श्रीकांत देवधर, राजेश मोरे, प्रा. शेखर कुलकर्णी, संदीप जंगम, नितीन देशमाने, मनोज जाधव, संदीप कुंभार, राजेश नारकर, प्रसाद देवळेकर, जितेंद्र खाडिलकर, मंदार माटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुण्याची ‘प्रतिगांधी’ ठरली ‘समर्थ एकांकिका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 11:19 PM