शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘बजेट हाउसिंग, प्लॉट’ खरेदीकडे ओढा

By admin | Published: February 15, 2015 11:06 PM

रचना प्रदर्शन : सातारकरांचा भरभरून प्रतिसाद; बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

सातारा : शहरापासून थोड्या अंतरावर पण निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या वातावरणात हक्काचं घर असावं. चिमुकल्यांना बागडायला अन् वृद्धांना विसावा घ्यायला घरासमोर बगिचा असावा. सर्व सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर असणारं असं एखादं घर आपल्याला परवडणाऱ्या किमतीत मिळावं, हीच एकमेव अपेक्षा आहे सातारकरांची. तसेच ‘प्लॉट’ खरेदीकडेही सातारकरांचा ओढा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर ‘रचना २०१५’ हे बांधकामविषयक सर्वकाही असणाऱ्या प्रदर्शन भरवलंय. जवळपास शंभर स्टॉल यामध्ये उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात घरकुलांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी शेकडो सातारकरांनी भेट देऊन आपल्या स्वप्नातल्या घरकुलाची चाचपणी केली तर अनेकांनी बुकिंगही केले. गुंतवणुकीसाठी जागा खरेदी करण्याकडेही मोठा कल असल्याचे दिसून येत आहे. साताऱ्याबरोबरच पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली याठिकाणी तसेच नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या सातारकरांनी प्लॉट खरेदीसाठी पसंती दर्शविल्याचे दिसते. हे प्रदर्शन चार दिवस चालणार असून दि. १७ रोजी सायंकाळी ८ वाजता सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)जागा खरेदीत गुंतवणूक केली तर भविष्यात ती जास्त फायदेशीर ठरते, शिवाय आपल्या हवे तसे घरही बांधता येते. त्यामुळे मुंबईस्थित सातारकरांचा ‘विकेन्ड होम’साठी जागा खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. - मजिद कच्छी, संचालक, कच्छी प्रॉपर्टीज्‘बजेट हाउसिंग’ ही संकल्पना सातारकरांमध्ये वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे साताऱ्यात इंडस्टी नाही, त्यामुळे इनकमही कमी आहे. साहजिकच लोकांना त्यांच्या खिशाला परवडतील अशा बजेटमध्ये बसणारं घर हवंय. - बालाजी मद्रेवार, व्यवस्थापक प्रमुख, कंग्राळकर असोसिएटस्परजिल्ह्यांतूनही प्रतिसादसातारा जिल्ह्यातील व इतर अनेक जिल्ह्यातील बिल्डर्सनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून अतिशय नाविन्यपूर्ण व आधुनिक स्टॉल्स्ची उभारणी प्रदर्शनामध्ये केली आहे. परजिल्ह्यातील ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.कृत्रिम वाळू निर्मिती यंत्रप्रदर्शनात कृत्रिम वाळू निर्मितीचे मशिन, रेडिमिक्स काँक्रीट मोबाईल बॅचिंंग प्लँट, काँक्रीट ब्लॉक मशिनरी, डोमेस्टीक लिफ्ट अशा यंत्रांचा समावेश आहे. उत्कृष्ट स्टॉलला गौरविणारप्रदर्शनातील उत्कृष्ट स्टॉलला दि. १७ रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमात विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.