शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

Satara: दरीत ढकलून दोघांचा खून, तिघांजणांच्या मुसक्या आवळल्या; एकीव धबधब्यावरील प्रकार 

By नितीन काळेल | Published: July 21, 2023 7:09 PM

७२ तासांत गुन्हा उघडकीस; संशयित सातारा शहरातील

सातारा : जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ किरकोळ भांडणातून दोघांना मारहाण करुन दरीत ढकलून देत खून केल्याप्रकरणी तिघाजणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. तर याप्रकरणी ताब्यात घेतलेले तिघेहीजण सातारा शहरातील रहिवाशी आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ अनोळखी दोघांनी इतर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दरीत ढकलून दिले होते. यामध्ये अक्षय शामराव अंबवले ( वय २८, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि गणेश अंकुश फडतरे (वय ३४, रा. करंजे पठे, सातारा) या दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार देवकर यांनी पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. हे पथक माहिती घेत होते. तपास सुरू असतानाच पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एकीव येथील गुन्हा हा चाैघांनी मिळून केल्याचे समजले. त्याप्रमाणे त्यांनी उपनिरीक्षक पाटील यांना संबंधितांना ताब्यात घेण्याची सूचना केली. या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. आसिफ माजीद शेख (वय २२), निखील राजेंद्र कोळकेर (वय २३) आणि साहिल मेहबूब शेख (वय १८, सर्व रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदर बझार सातारा) अशी त्यांची नावे आहेत. संशियततांकडे विचारपूस केल्यावर त्यांनी किरकोळ भांडणाच्या कारणातून मारहाण करुन दोघांना दरीत ढकलून दिल्याचे सांगितले. सध्या तिघांही सशंयितांना मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस