शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चतुर्भुज झाला अखेर चतुर्भुज,लाचलुचपतची शिरवळ येथे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:04 AM

   शिरवळ पोलीस स्टेशनमधील वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज नारायण चव्हाण-काशीद याला २ हजार रुपये लाचेची मागणी करत स्विकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

ठळक मुद्देचतुर्भुज झाला अखेर चतुर्भुज,लाचलुचपतची शिरवळ येथे कारवाई २ हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अटकेत

शिरवळ /सातारा :   शिरवळ पोलीस स्टेशनमधील वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज नारायण चव्हाण-काशीद (वय ५७, सध्या रा. शिरवळ, ता.खंडाळा, मूळ रा.कोळकी ता.फलटण ) याला खाजगी चारचाकी गाडीवर अवैध वाहतुकीची कारवाई न करण्याकरीता २ हजार रुपये लाचेची मागणी करत स्विकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चतुर्भुजच चतुर्भुज झाल्याने शिरवळमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे संबंधित वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज चव्हाण - काशीद येत्या चार महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणार होता.याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी खाजगी चारचाकी गादीवर अवैध प्रवाशी वाहतुकीची कारवाई करतो असे सांगून संबंधित तक्रादाराकडे शिरवळ पोलीस स्टेशनचा वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज चव्हाण-काशीद याने लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार तडजोडीअंती २ हजार रुपयांमध्ये तडजोड करत शिरवळ येथील एका खाजगी रुग्नालयालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये २ हजार रुपये स्विकारताना चतुर्भुज चव्हाण-काशीद याला सातारा येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे हॉटेलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान, शिरवळ येथील चतुर्भुज चव्हाण-काशीद याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ची कारवाई झाल्यानंतर विविध चर्चेला उधाण आले असून चतुर्भुज काशीद-चव्हाण याला सातारा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे शिरवळ परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईमध्ये पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक शिर्के, पोलीस हवालदार संजय साळुंखे, विशाल खरात,तुषार भोसले, निलेश येवले यांनी भाग घेतला.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSatara areaसातारा परिसर