कऱ्हाड : ‘सद्गुरू आश्रमशाळेचा शालेय परिसर नीटनेटका, स्वच्छ व निसर्गरम्य आहे. विद्यार्थ्यांना यातून आपसूकच पर्यावरण रक्षण तसेच स्वच्छतेचा संदेश मिळत आहे. भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असूनही शाळेची गुणवत्ता प्रेरणादायी आहे’, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात यांनी केले.
शेरे (ता. कऱ्हाड) येथील सद्गुरू आश्रमशाळेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. कोरोना काळात शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शक्य असेल तिथे वंचित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब समजताच अविनाश खरात यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेच्यावतीने नूतन संचालक अविनाश खरात यांचा शिक्षक आशपाक आत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, संभाजी पाटील, विष्णू खरात, प्रमोद रामधुमाळ, नामदेव पाटील, प्रकाश फार्णे, पांडुरंग गायकवाड यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
फोटो : १८ केआरडी ०४
कॅप्श्न : शेरे (ता. कऱ्हाड) येथील सद्गुरू आश्रमशाळेत अविनाश खरात यांचा सत्कार आशपाक आत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.