महाबळेश्वर : महाबळेश्वरातील वाहतुकीचा होणाऱ्या कोंडीचा गचाळपणाची जवाबदारी पालिका प्रशासन व पोलीस खाते यांच्यामुळे होत आहे, असा संताप स्थानिक नागरिकांमधून होत आहे. दि. १ मे ते ५ मे पर्यंत सलग सुट्या होत्या व याचवेळी राज्यपालांचा दौरा होता. यावेळी तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. या दरम्यान वाहतूक कोंडी झाली नाही. पालिका प्रशासन व पोलीस खाते एकदम शिस्तबध्दतेने काम करत होती राज्यपालाचा दौरा संपल्यानंतर बोटावर मोजण्याइतकेच पोलीस कर्मचारी का ठेवले, असा प्रश्न जनततून निर्माण होत आहे .उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले असून वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीच्या व्यवस्थेचा गचाळपणा पुन्हा एकदा डोक्यावर बसलेले आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहर परिसर हाऊस फूल झाला आहे. महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे देश विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. विशेषत: उन्हाळी हंगामामध्ये पर्यटकाची संख्या लक्षणीय राहते. सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात चालू आहे. शहरात रस्त्यावर अलिशान गाड्यांच्या व असंख्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत होवू लागली आहे. त्याचा फटका पर्यटकांसह स्थानिक टॅक्सीवाले व नागरिकांना बसत आहे. पाचगणी दांडेघर येथील टोल नाक्यापासूनच वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत, तेथून पुढे मॅप्रो गार्डन येथे जास्त वाहने बसतील, अशा प्रमाणाचे वाहतळ नसल्यामुळे पर्यटक खरेदी करताना वाहने वाकडी तिकडी लावून जातात, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे वाईकडून येणाऱ्या वाहनांना तासतास एका जागेवर थांबावे लागते .हीच परिस्थिती वेण्णालेकजवळ वेण्णालेक येथून बाजार पेठेत येण्यासाठी तब्बल दोन तास मोजावे लागतात. वाहनतळ पुरेसे नसल्यामुळे पर्यटक खरेदी करताना वाहने वाकडी तिकडी लावून जातात, अशीच परिस्थिती माखरिया गार्डन, बाळासाहेब ठाकरे चौक, मसजीद रोड, शिवाजी चौक व सुभाषचौक या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहेमहाबळेश्वरात वाहतुकीचा होणारा गचाळपणा थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)शहरातील वाहतुकीस बेशिस्तपणा आला असून बारा महिने पर्यटकाची आवक असते त्या संर्दभात नियाजन पोलिस खात्याकडून केले जात नाही. नो पार्किंग, एकेरी मार्ग, दुहेरी मार्ग हे वाहतुकीचे नियम सर्व ढाब्यावर कोणी पाळताना दिसत नाही. पालिकेतून नो पार्किग, ऐकेरी मार्ग, दुहेरी मार्ग, चे फलक ही दिले गेले नाही. हंगाम पूर्वी वाहतुक व्यवस्थेसाठी नगरपालिकेत मिटीग आयोजित केली जाते पंरतु यामिटीगला प्रांत अधिकारी , तहसलिदार , मुख्याधिकारी ,पोलिस निरीक्षक उपस्थित असतात पण ही मिटीग घेतली गेली नाही.ट्रॅफिक नियोजनाबात दरवर्षी पालिका व पोलीस प्रशासनाची नियोजन बैठक होते. यंदा ही बैठक होऊ शकली नाही. ट्रॅफिक समस्येबाबत पोलीस अधीक्षकांशी अनेकदा संपर्क साधला. यानंत महाबळेश्वरात दहा पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पालिकेने ट्रॅफिक निवारणासाठी पालिका कर्मचारी व काही मुलांची हंगामी स्वरूपात नियुक्ती केली आहे.- उज्ज्वला तोष्णीवाल, नगराध्यक्षा, महाबळेश्वर, न. पा.
महाराष्ट्राच्या नंदनवनात वाहतूक कोंडीचा प्रश्न
By admin | Published: May 28, 2015 9:49 PM