सातारा : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता आणि जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात यंदा घट होणार आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३८.८१ टक्के तर माण तालुक्यात अवघ्या १७.५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटण आणि खंडाळा तालुक्यातही कमी पेरणी झाल्याचे दिसत आहे. विशेषत: करुन माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पेरणीचे खरे संकट आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम घेण्यात येतो. तर साधारणपणे आॅक्टोबर महिन्यापासून पेरणी होते. चांगला पाऊस झाला तरच शेतकºयांना उत्पादन मिळते. पण, अनेकवेळा पावसाअभावी पेरण्या करुनही हाती फारसे उत्पन्न येत नाही. सध्या अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामध्ये माण, खटावला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना शेतीसाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच जमिनीत ओल नसल्याने पेरणी करुन काय फायदा असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. तर यापुढे पाऊस पडणार नसल्याने चारा नाही, जनावरे कशी जगवावीत असाही प्रश्न आहे.
रब्बी हंगाम : दुष्काळी भागातील पेरणीला पावसाअभावी ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:46 AM
फलटण आणि खंडाळा तालुक्यातही कमी पेरणी झाल्याचे दिसत आहे. विशेषत: करुन माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पेरणीचे खरे संकट आहे.
ठळक मुद्देरब्बी हंगाम : दुष्काळी भागातील पेरणीला पावसाअभावी ब्रेक !जिल्ह्यात ३९ तर माणमध्ये अवघ्या १७.५३ टक्के क्षेत्रावर पेरणीपूर्व भागात उत्पादन कमी होणार