कºहाड : ‘नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शिवसैनिक राहुल फाळके यांच्या चार वर्षे मुलाची संपूर्ण शिक्षण आणि कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. आर्थिक तरतूद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या व पत्नीच्या नावे प्रत्येकी दहा लाख नावे जमा केले आहेत,’ अशी माहिती शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली.वनवासमाची, ता. कºहाड येथील रहिवाशी व सोने-चांदीचे व्यापारी, शिवसैनिक राहुल फाळके यांनी जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यवसाय अडचणीत आल्यामुळे आत्महत्या केली. राहुल यांच्या आत्महत्येनंतर शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने खासदार गजानन कीर्तीकर यांनी राहुल फाळके यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांची रविवारी भेट घेऊन सांत्वनकेले.यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, चंद्र्रकांत जाधव, सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, कलाताई शिंदे, छायाताई शिंदे, सातारा जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, कºहाड तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, नितीन काशीद तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.राहुल फाळके यांचा चार वर्षांचा मुलगा संस्कार याच्या शिक्षणासाठी शिवसेनेच्या वतीने दहा लाख रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात येणार आहेत. पत्नी अर्चना फाळके हिचे नावाने दहा लाख रुपये ठेवी ठेवण्यात येणार आहेत. एकूण वीस लाख रुपयांच्या ठेवीमधून येणाऱ्या व्याजातून मुलाचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. राहुल फाळके यांनी मृत्यूपूर्वी फेसबुकवर व्यक्त केलेले मनोगताची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्या असून, राहुल फाळके यांनी मृत्यूपूर्वी शिवसेनेकडे त्याची अडचण सांगितली असती तर शिवसेनेने यातून मार्ग काढला असता असेही खासदार गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. जी मदत करणे शक्य आहे. ती सर्व मदत कुटुंबीयाला केली जाईल, अशी ग्वाही गजानन कीर्तीकर यांनी देऊन राहुलच्या पुढील विधीसाठी काही रोख रक्कम मदत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना दिली.यावेळी मलकापूर शहरप्रमुख मधुकर शेलार, सूर्यकांत मानकर, अजित पुरोहित, बापू भिसे, शशिराज करपे, शेखर बर्गे, प्रवीण लोहार, उत्तम जाधव, दिलीप यादव, संजय चव्हाण, अभिजित पाटील, अनिता जाधव यांच्यासह शिवसैनिक व वनवासमाचीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुलच्या कुटुंबाला सेनेकडून वीस लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:15 PM