बामणोली : तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास बामणोली तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले आहे.तापोळ्या पासून जवळच वाघेरा गावाजवळ शनिवारी सकाळी नऊ वाजता महाबळेश्वर रस्त्यावर प्रचंड मोठी दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या ठिकाणी मातीचा प्रचंड मोठा ढिगारा व मोठे-मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. दरड हटविण्यासाठी अनेक तास लागणार असल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. त्यामूळे या मार्गावरील दळणवळण सेवा पुर्णपणे कोलमडून पडली आहे. या ठिकाणी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे तातडीने या मार्गावरील दरड हटविण्याची मागणी या परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे.कास बामणोली रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तसेच कासच्या पुलावरून अधून- मधून पाणी वाहत असल्याने सातारा बामणोली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गावांमध्ये चार दिवसांपासून वीज गायब झाली आहे. पावसामुळे शेतीलाही फटका बसला आहे. भातशेतीच्या खाचरांचे बांध पडून शेती गाडून गेली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत
तापोळा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:45 PM
तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास बामणोली तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले आहे.
ठळक मुद्देतापोळा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळलीरस्ता पूर्णपणे बंद : तातडीने दरड हटविण्याची मागणी