लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील सोमवार पेठेत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व दुचाकी असा सुमारे १ लाख ४८ हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी भोलाद्दीन बाबासाहेब मुजावर (वय ४७), सतीश बाळासाहेब रुईकर (वय ४६), प्रमोद गोपाळ मांडवकर (वय ४०, तिघेही रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), राजेंद्र बाळासाहेब शेलार (वय ३५, रा. भवानी पेठ), नासीर अब्दुल करीम बागवान (वय ४२), बाळू रामचंद्र मुके (वय ६०), दीपक बजरंग किर्वे (वय ३३, तिघेही रा. सोमवार पेठ) आणि बुद्रुद्दीन मेहबुब बागवान (वय ४०, रा. दस्तगीर कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत.
सातारा शहरातील सोमवार पेठेमध्ये भुतकर यांच्या घराच्या पाठीमागील आंब्याच्या झाडाखाली तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकण्यात आला. शितोळे यांच्यासह हवालदार अमित माने, लैलेश फडतरे व ओंकार यादव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
............