शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, चौघे अटकेत; नागठाणेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 4:26 PM

दोन दिवसांपूर्वी मुुंबई येथून एका संशयिताला अटक केल्यानंतरच हे प्रकरण अधिकाऱ्यांनी समोर आणले.

सातारा : नागठाणे, ता, सातारा येथील एका ढाब्याच्या पाठीमागे विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून १५० लिटर क्लोरोल हायड्रेडयुक्त बनावट ताडीसह सुमारे ५ लाख ९७ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.सुहास हणमंत साळुंखे, विजय जयसिंग साळुंखे, मिलिंद तुकाराम घाडगे (सर्व रा. नागठाणे, ता, सातारा), राजू व्यंकट नरसय्या भीमानाथिनी (रा. नेवोलीनाका, डोंबविली, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबात माहिती अशी की, नागठाणेतील एका ढाब्याच्या पाठीमागे अवैधरीत्या मानवी शरीरास घातक असा विषारी क्लोरोल हायड्रेट कारखान्यात तयार केला जातो, अशी माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकून बनावट ताडीसह अन्य वस्तू जप्त केल्या. ही कारवाई महिनाभरापूर्वीच करण्यात आली होती.मात्र, यामध्ये आणखी संशयित आरोपी असल्यामुळे याची उत्पादन शुल्कच्या विभागाने वाच्यता केली नव्हती. दोन दिवसांपूर्वी मुुंबई येथून एका संशयिताला अटक केल्यानंतरच हे प्रकरण अधिकाऱ्यांनी समोर आणले.या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक के. बी. बिरादार, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम यांनी भाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी