सातारा : येथील पोवई नाक्यावरील दूध डेअरी परिसरातील जुगार अड्ड्यावर सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष दिलीप मतकर (वय ३२, रा. मंगळवार पेठ), अक्षय वाघमारे (२४, रा. जगतापवाडी, शाहूनगर), अमर चंद्रकांत जाधव (३२, रा. शाहूपुरी), सुमित परशुराम बनसोडे (२२, रा. म्हसवे, ता. सातारा), अक्षय नंदू जाधव (२३, रा. करंजे पेठ), अक्षय संजय जाधव (२३, रा. रविवार पेठ), फिरोज युनुस पठाण (५०, रा. सदरबझार), सुभाष वसंत मोरे (४५, रा. बेबलेवाडी, ता. सातारा), जीवन कृष्ण काळे (४२, रा. करंजे पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा कॅफे व दूध डेअरी परिसरात एक जानेवारी रोजी सायंकाळी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा उपविभागीय कार्यालयातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार केले व घटनास्थळी छापा टाकला.