सातारा: शहरासह तालुक्यात दोन ठिकाणी पोलिसांनी दारू अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून दारूचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सातारा शहरातील रविवार पेठेत असणाऱ्या एका कपड्याच्या लॉन्ड्रीशेजारी एकजण दारू विक्री करत असल्याची माहिती रविवार पेठ पोलीस चौकीतील हवालदार अजित जगदाळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तेथे जाऊन छापा टाकला असता महादेव रजनीकांत शिंदे (रा. मल्हार पेठ सातारा) हे दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यातील ५१०० रुपयांचा ३४ दारूच्या बाटल्या जगदाळे यांनी जप्त केल्या.
दरम्यान, परळी तालुका सातारा येथे एका दुकानाच्या आडोशाला दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला पकडले. त्याच्या ताब्यातून ८४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
मनोज बबन राऊत (वय ३८ रा. परळी तालुका सातारा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
परळी येथील एका स्वीट मार्टच्या दुकानाच्या आडोशाला एकजण दारू विक्री करत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मनोज हा सापडला. त्याच्या ताब्यातून दारूचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.