वाठार स्टेशन : नगर चौफुला ते सातारा या राज्य मार्गावरील देऊर, ता. कोरेगाव येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ गुरुवार, शुक्रवारी दोन दिवसांकरिता बंद राहणार आहे. या काळात पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, देऊर येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे रेल्वे रुळाच्या दुरुस्ती, तसेच निरीक्षणाकरिता गुरुवार, दि. २३ सकाळी सातपासून शुक्रवार दि. २४ रोजी सायंकाळी सातपर्यंत दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनधारकांनी सातारा व कोरेगावला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. यामध्ये वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक-दहीगाव-देऊर. वाठार स्टे-दहीगाव-देऊर, वाठार स्टेशन-तळिये-बिचुकले-गुजरवाडी-पळशी, तसेच वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक-वाघोली-अनपटवाडी-अंबवडे चौक पुढे सातारा व कोरेगावला जाण्याकरिता वापर करावा.
त्याचप्रमाणे सातारा व कोरेगावकडून पुणे, लोणंद, अहमदनगर, फलटणकडे जाण्यासाठी अंबवडे चौक-अनपटवाडी-वाघोली-पिंपोडे बुद्रुक-वाठार स्टेशन. अंबवडे चौक-पळशी-गुजरवाडी-बिचुकले-तळीये-वाठार स्टेशन. देऊर-दहीगाव-पिंपोडे बुद्रुक-वाठार स्टेशन. देऊर-दहीगाव-वाठार स्टेशन या मार्गांचा वापर करता येईल.
वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून आपला प्रवास सुखकर करावा अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून वाठार स्टेशन येथील वाग्देव हायस्कूलच्या चौकात बॅरिकेडस् लावण्यात येणार आहेत, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.