वाई : परतीच्या धुवाँधार पावसामुळे वाई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर खरीप हंगामातील पिके कुजून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, वरुणराजा थांब आता म्हणण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. तर पावसामुळे घेवडा, सोयाबीन, उडीद, वाटाणा ही पिके शेतातच कुजलीत.
वाई तालुक्यात परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वरुणराजा कधी थांबतोय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर पश्चिम भागात भात पिकांवर अतिवृष्टीचा विपरित परिणाम झालाय. कारण, शेतातील पाणीच निघत नसल्याने शेतकºयांसह सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच सततच्या पावसाने जनावरांचा चारा वाया गेलाय. परिणामी चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तर प्रचंड पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडलेत. त्यातूनच वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
सततच्या या पावसामुळे खरीप हंगामातील कोरडवाहू जमिनीतील पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असलेतरीही भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आलीय. बियाण्यांसह खते, रोजंदारीसाठी झालेला हजारो रुपये खर्चही निघणे अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. परिणामी वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पाऊस उघडण्याचे नावच घेत नसल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेलाय. घेवडा, सोयाबीन, उडीद, वाटाणा ही पिके शेतातच कुजल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तर काही पिकांची वाढच झाली नाही. ज्या ठिकाणी पेरणी उशिरा झाली आहे ते पीक उगवलेच नाही, आता कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील काही भागात स्ट्रॉबेरी घेतली जाते. याचेही मोठे नुकसान झाले आहे.औंध भागातील शेतकºयांवर अस्मानी संकटऔंध : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे औंध भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बटाटा, वाटाणा, घेवडा, मूग, भुईमूग आदी पिके हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच अनेक ठिकाणी पिकात पाणी असून, पंचनाम्याची मागणी होत आहे.खटाव तालुक्यातील व विशेषत: औंध भागातील शेतकºयांचे प्रमुख नगदी पीक बटाटा म्हणून ओळखले जाते. यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला व पोषक झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे औंधसह जवळपास ५० गावांनी बटाटा लागण मोठ्या उत्साहात केली. गेल्यावर्षीच्या दुष्काळामुळे यंदा आपल्या कष्टाचे चीज होईल, या आशेवर असणाºया शेतकºयांना आता अतिवृष्टीमुळे मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
सर्वसाधारणपणे एक एकर बटाटा लागणीसाठी बियाणे, खते, लागण, मजुरी यासह ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. औंधसह परिसरात शेकडो एकराच्यावर लागण झाली आहे. आता सततचा पाऊस, ढगाळ हवामान, पीकवाढीसाठी आवश्यक असणाºया सूर्यप्रकाशाचा अभाव अशी बिकट परिस्थिती शेतकºयांसमोर आहे. त्यातच संततधार पावसामुळे शेतजमीन उपळली असून, लावलेल्या बटाटा सरीमधून पाणी वाहताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून शासन दरबारी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबणीवर गेली आहे. पाऊस उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे.बटाटा वाया जाणार...औंध परिसरात बटाटा हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. आता गेल्या काही दिवसांपासून होत असणाºया सततच्या पावसामुळे बटाटा वाया जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच या पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही.