सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप असून, सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला अवघे १ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर धरणात ४२.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. दरम्यान, सातारा शहरासह परिसरात ढगाळ वातावरण कायम होते.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात १० दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. सध्या तर जिल्ह्यात पावसाची पूर्णपणे उघडीप आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगरला १ तर जूनपासून ९१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नवजा येथे ४ तर यावर्षी आतापर्यंत १०५३ मिलिमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर महाबळेश्वर येथे सकाळपर्यंत ५ आणि जूनपासून १,२०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ४२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात ४,७४७ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे.
दरम्यान, सातारा शहर व परिसरात पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे तर पूर्व भागातही पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगाम पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
.......................................................