खटाव : परिसरात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती शेतकºयांना लागून राहिली असताना पावसाने बुधवारी शिडकावा केल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
मान्सून पूर्व पावसाने पिकांची वाढ चांगली झाली असली तरी सध्या आलेल्या पिकांना मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याने बळीराजा आतुरतेने पाऊस पडण्याची वाट पाहत आहे.
पावसाने ओढ दिल्याने परिसातील बहुतांश ठिकाणची खरीप पिके वाया गेली आहेत. काही पिके अद्याप तग धरून आहेत त्यांना मोठ्या पावसाची गरज आहे. जर पाऊस झाला नाही तर पूर्ण खरीप पिके पडत असलेल्या कडक उन्हाने जळून जातील, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून व्यक्त होत आहेत.