शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पाऊस सैराट अन् नद्या-नाले सुसाट..!

By admin | Published: July 12, 2016 11:33 PM

कऱ्हाड, पाटण तालुक्यात हाहाकार : उरूल, ठोमसे, पोतले, आणेत पूल पाण्याखाली; मराठवाडी, महिंद धरण भरले; घरांची पडझड

कऱ्हाड/मल्हारपेठ/सणबूर : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात धुवाधार पाऊस सुरूच असून कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह वांग, दक्षिण मांड, केरा, मोरणा, तारळी, काफना या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओढ्यांनाही पूरस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कऱ्हाड तालुक्यातील पोतले, आणे व पाटण तालुक्यातील ऊरूल, ठोमसे येथील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढेबेवाडी खोऱ्यातील मराठवाडी व महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गत चार दिवसांपासून कऱ्हाड व पाटण तालुक्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. सोमवारी दिवसभरात अनेक फरशी पुलांना पाणी घासत होते. मात्र, रात्री उशिरा पाण्याची पातळी आणखी वाढल्याने हे पूल पाण्याखाली गेले. कऱ्हाड तालुक्यातील वांग नदीवरील पोतले व आणे येथील फरशी पूल सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेला. त्यामुळे आणे, येणके, किरपे या गावांचा कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाशी संपर्क तुटला आहे. तसेच पाटण तालुक्यातील उरूल व ठोमसे येथील पूलही पाण्याखाली गेले आहेत. मल्हारपेठ विभागात गत चार दिवसांपासून पावसाचा जोर आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने सुरुवात केली. त्यामुळे उरूल, ठोमसे येथे असणाऱ्या ओढ्याला पूर येऊन दोन्ही साकव पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला आहे. उरूल, ठोमसे, बोडकेवाडी या तीनही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे साकव पूल आहेत. नेहमीच पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या गावापासून दूर आहेत. त्यामुळे पूर आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. उरूल, ठोमसे येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या फणशीच्या ओढ्याला पूर आल्यामुळे दरवर्षी या पुलांचे नुकसान होत आहे.दरम्यान, ढेबेवाडी विभागामध्ये गत चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे परिसरातील नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. तसेच डोंगरावरून वाहत येणारे पाणी गावातील ओढ्यात मिसळत असून, काही ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. विभागातील मराठवाडी व महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे येथील वांग नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच याच रस्त्यावरील ढेबेवाडी बसस्थानकानजीकचा फरशी पूलही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद झाली आहे. परिसरातील अनेक गावांतील ओढे नाल्यांना मोठे पाणी आले आहे. त्यामुळे काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी ढेबेवाडीचा आठवडी बाजार होता. मात्र, पावसामुळे बाजारात विक्रेत्यांसह खरेदीदारांची संख्या कमी होती. बाजारतळावर अक्षरश: शुकशुकाट जाणवत होता. तसेच मंद्रुळकोळे खुर्द येथील मुख्य रस्ता पावसामुळे तुटल्याने परिसरातील वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काढणे, ता. पाटण येथील वांग नदीवरील पुलाचा भराव जोराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे काढणे, तुपेवाडी, बागलवाडी यासह अन्य काही गावांचा संपर्क तुटला आहे. अंबवडे खुर्द येथील ज्ञानदेव गणपती नांगरे यांच्या घराची भिंत कोसळल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. भात पीक पाण्याखाली गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी शिवारातच तळे निर्माण झाले असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मलकापूरसह, कापिल गोळेश्वर, पाचवड, आटके, नारायणवाडी येथे भाताचे पीक पाण्याखाली गेले आहे. वीज पंपाने पाणी काढण्याचा उद्योगकऱ्हाड शहरातील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप चौकापर्यंत अनेक दुकान गाळ्यांमध्ये गटाराचे पाणी शिरले आहे. गटार तुंबल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, दुकानगाळ्यात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी व्यावसायिक वीज पंपाचा वापर करीत आहेत. या पाण्यामुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.