सातारा : सातारा शहर व परिसरात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस पडला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर वाऱ्यासह हलका पाऊस झाला, तर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
सातारा शहर व परिसरात मागील दहा दिवसांपूर्वी सलग तीन दिवस वळवाचा पाऊस पडला होता. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच उकाडाही कमी झालेला होता. मात्र, त्यानंतर तापमान वाढत गेले. परिणामी दिवसा ऊन तर रात्री उकाडा जाणवत होता. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. असे असतानाच शुक्रवारपासून पुन्हा वळीव पाऊस पडण्यास सुरुवात झाली. शनिवारी सायंकाळीही पावसाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. तर रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यातच वारेही वाहत होते. दुपारनंतर काही भागात पावसाने हजेरी लावली. यावेळी वारे जोरात वाहत होते.
तीन दिवसांपासून पाऊस आणि थंडगार वारे वाहत असल्याने उकाडा कमी झाला होता, तर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
.........................................................................