मलकापूर : मलकापूरसह परिसरात सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्रीपासून पडलेल्या जोराच्या पावसामुळे सर्वत्र गटर भरून पाणी वाहत असल्याने झाल्यामुळे दाणादाण उडाली. उपमार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानांत पाणी शिरले. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरातील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शहरात उरलेल्या शेतीचा तलाव बनल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मलकापूर परिसरात बुधवारी रात्रीपासून ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाच्या सरीसह संततधार पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. उपमार्गासह ठिकठिकाणी नाले भरून वाहत असल्याने रस्ते जलमय झाले होते. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत मोरया काॅम्प्लेक्समधील दहा दुकानांत, शिवछावा चौकातील गुरुकृपा अपार्टमेंटमधील देवकर हार्डवेअर दुकानासह पाच दुकानांत, तर स्वामी एंटरप्रायजेसच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने मालासह फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या अनेक दुकानांत अचानक पाणी शिरल्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. बेसमेंटच्या दुकानातील पाणी काढण्यासाठी दुकानदारांनी रात्री उशिरापर्यत विद्युतपंप लावले होते.
मलकापूरसह परिसरात सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. आसे असतानाही काही शेतकऱ्यांची शेती शिल्लक आहे. दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नैसर्गिक पाणी व्हाऊन जाण्याचे स्तोत्र बंद झाल्यामुळे या शिल्लक शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तलावच बनले आहेत. या शेतातील पाणी बाहेर नाही गेले तर आशा शेतकऱ्यांचा खरीप पिकाचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
चौकट (फोटो आहे)
तुळजाईनगर परिसरातील घरात पाणी
तुळजाईनगर परिसरातील नवरंग हॉटेल, दत्तात्रय साळुंखे यांच्या ट्रेलर बनवण्याच्या कारखान्यासह घरात, नेर्लेकर यांच्या घरात बुधवारी झालेल्या पावसाचे पाणी घुसल्यामुळे संसारउपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.
चौकट (फोटो आहे)
खंडोबानगर परिसरात दुकानात पाणी
पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी थेट घरांमधे व दुकानात शिरत आहे. रात्रभर ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने खंडोबानगर परीसरात चांगलीच दैना उडाली. देगावकर यांच्या रिकामे बॅरलच्या दुकानात दोन फूट पाणी होते.
चौकट (फोटो आहे)
उपमार्गालगतचा नाला तुंबल्याने उमाळे
जोरदार पावसामुळे बैलबाजार रस्ता ते डुबलनगर परिसरातील पाणी उपमार्गालगतच्या नाल्यात येते. सह्याद्री इक्विपमेंट समोर नाला तुबल्यामुळे उमाळे लागले. त्यातून बाहेर पडलेले पाणी उपमार्गावरून प्रवाहीत झाले.
फोटो कॕप्शन
मलकापुरात आगाशिवनगर, लाहोटीनगर व डुबलनगर परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या इमारती झाल्यामुळे मधेच शिल्लक राहिलेल्या शेतीचे तलाव बनले आहेत. (छाया : माणिक डोगरे)