भटक्या कुत्र्यांची विद्यार्थ्यांत भीती
सातारा : येथील मटण व मच्छी मार्केटलगत साचत असलेल्या कचऱ्याभोवती मोकाट कुत्र्यांचे टोळके थांबत आहे. बंदोबस्त करण्याची गरज आहे. या ठिकाणी टाकलेल्या मांसामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व माणसांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
पदपथावर पुन्हा अतिक्रमणे वाढली
सातारा : येथील पदपथावरील अतिक्रमणे वाढू लागली आहेत. त्याचा पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने येथील बसस्थानक, राजवाडा परिसर, स्टेट बँक परिसरात असणारी अतिक्रमणे त्वरित हटविण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.
ऐन गरजेच्या वेळी शेतमजुरांची टंचाई
सातारा : खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहे, तिथे पिके उगवून आली असली तरीदेखील तण काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मात्र, त्याला मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत आहे. जादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी स्वत: शेतात काम आहे.
रात्री तळीरामांचा उच्छाद
सातारा : भाजीमंडई, बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी तळीरामांचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री दारू पिऊन भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या तळीरामांना पकडून त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांसह प्रवाशांतून केली जात आहे.