शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

Satara: जुलैत पावसाचे प्रमाण चांगले; कोयना धरणातील पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला

By नितीन काळेल | Published: July 16, 2024 6:19 PM

२४ तासांत नवजा २० तर महाबळेश्वरला १७ मिलीमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असलीतरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचलाय.जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. तरीही पावसाची उघडझाप चिंता वाढवत आहे. शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. कास, बामणोली, तापोळा, बामणोलीसह कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झाेडपले. सातारा शहरातही जोरदार पाऊस पडला. तसेच वाई, कऱ्हाड, जावळी तालुक्यातही पाऊस बरसला. पण, सोमवारपासून पाऊस कमी झाला आहे. त्यातच सूर्यदर्शनही घडत आहे. मंगळवारीही जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम होती. अपवादात्मक स्थितीत पाऊस होत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोयनानगर येथे ८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ९९० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. नवजा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला. दीड महिन्यात २ हजार ३१९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत १ हजार ७६९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आवकही कमी झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास सुमारे १९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ४२.०६ टीएमसी झालेला.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. तर सातारा शहरात ढगाळ वातावरण राहत आहे. काहीवेळा सूर्यदर्शनही घडत आहे. तर पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे. खरीप हंगामातील पिके चांगली आली असून भांगलणी सुरू झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण