कातरखटाव : दहिवडी-मायणी मार्गावर कातरखटाव (ता. खटाव) येथे बुधवारी सकाळी सांगलीहून गाझियाबादकडे बेदाणा घेऊन निघालेला ट्रक पलटी झाला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरज-भिगवण राज्य मार्गावर ठेकेदाराने रस्त्याकडेच्या साईडपट्ट्याचे निकृष्ट काम केल्याचे अनेकवेळा आवाजही उठविला होता.
बुधवारी सकाळी बेदाण्याने भरलेला ट्रक (आरजे ११ जीबी ४१४६) सांगलीहून गाझीयाबादकडे निघाला होता. हा ट्रक समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला साईड देत असताना चाके रस्त्यावरून खाली उतरली. रस्त्याची साईडपट्टी खोल असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने येथील स्थानिक सतीश जंगम (वय ४७) दूध घालण्यासाठी निघालेल्या या युवकास ट्रकची धडक बसली व त्यानंतर ट्रक पुढे शंभर मीटरवर जाऊन ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रकचा क्लिनर ब्रिजेश पाल (वय २७) किरकोळ जखमी झाला, तर सतीश जंगम यांच्या डोक्यास जोरात धडक दिल्याने ते बेशुद्ध होऊन गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
कातरखटाव : साईटपट्ट्याचे काम ‘लावलीजाव...’ केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. (छाया - विठ्ठल नलवडे )