जावेद खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आजवर उंट की सवारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यातील राजपथाने कात टाकली आहे. या रस्त्याचे गुळगुळीत डांबरीकरण केले असून ठिकठिकाणी ऑईलपेटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना आपण पुणे, मुंबईतल्या मार्गावरून जात असल्याचा आभास होत आहे. ही परिस्थिती आणखी अशीच राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१.
सातारा पालिकेजवळ आल्यानंतर वाहनचालकांचा वेग कमी करण्यासाठी आधुनिक पद्धतीने गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित राहत आहे.
२. राजपथाच्या मधोमध पांढऱ्या रंगाचा गडद पट्टी आखण्यात आली आहे. त्यामुळे समोरून येणारी वाहने आपल्या ट्रॅकवरून जातात. मात्र, अनेक ठिकाणाहून रस्ते जोडतात. सुसाट वाहनचालकांना याची जाणीव व्हावी, यासाठी त्या ठिकाणी ही पट्टी तुटक तुटक केली आहे.
३.
राजपथावरील देवी चौक, कमानी हौद परिसरात एसटीचा थांबा आहे. या ठिकाणी एसटी उभी राहण्यासाठी मोठ्या आकाराचे चौकोन केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होत आहे.