सातारा/कºहाड : ‘ऊसदराच्या एफआरपीबाबत हे ‘कमळा’चे सरकार शेतकºयांचा विश्वासघात करणार म्हणून आम्ही एक महिना अगोदर सांगितले होते. ते नंतर खरे झाले. आता शेतकºयांची घोर फसवणूक करणाºया भाजपच्या कमळावर कोणते तणनाशक फवारायचे हे शेतकºयांनी ठरवावे,’ असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी व्यक्त केले.‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे जात असताना जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी कºहाड येथे त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते माध्यमप्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, योगेश झांबरे, प्रदीप पाटील आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ‘दूधदरवाढ आंदोलनाचे यश हे दूध उत्पादक शेतकरी बांधवांचे आहे. हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागले. ‘स्वाभिमानी’च्या दूधदरवाढ आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. काही शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतले. या घटनेचा सरकारमधील काही लोक निषेध करताहेत. खरंतर त्यांनी हे समजून घ्यावं की, या सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झालाय. तो धुऊन काढण्यासाठी शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतले आहे. शेतकºयांनी जसे दूध रस्त्यावर ओतलं आहे, तसं त्याचा चांगलाही वापर केला आहे. पंढरपूरकडे जाणाºया वारकºयांना, शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांनाही शेतकºयांनी दूध वाटलं आहे. १ कोटी ३५ लाख लिटर दूध हे शेतकºयांनी चांगल्या कामासाठी वापरलं आहे.’
‘राज्यातील राज्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार केलाय, पैसा खाल्लाय. शेतकºयांनी दुधाचे अभिषेक घालून पवित्र केलं असल्याचं म्हणावं लागेल. इशारा देऊनही सरकारने जे करायचे होते तेच केले. एका बाजूला साडेपंचवीसची एफआरपी २७५० केली. म्हणून स्वत:चीच पाठ स्वत: थोपटून घ्यायची आणि दुसºया बाजूला साडेनऊ टक्के रिकव्हरी फेस दहा टक्के करून टनाला १४५ रुपये शेतकºयांचा तोटा करायचा. कारण आत्ताची जी एफआरपी आहे. ही साडेसत्ताविसशे रुपये दहा टक्के रिकव्हरीला आहे. आणि त्यानंतरच्या रिकव्हरीला २८९ रुपये आहे. एफआरपी वाढली ती फक्त ५५ रुपये. मग अशा प्रकारे हिशोबात घोळ करून असा विश्वासघात करायचा अधिकार सरकारला कोणी दिला आहे? असा प्रश्न विचारत, हे सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. हे सरकार शेतकºयांच्या विरोधी सरकार आहे. भाजपने अविश्वासाचा ठराव जिंकला तरी ते २०१९ नंतर भाजप विरोधी बाकावर छोट्या मतात बसलेला दिसेल.’शेतकºयांच्या सहभागामुळे आंदोलन यशस्वीसातारा येथील वाढे फाट्यावर खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. सातारी कंदी पेढा भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, शेतकºयांनी या आंदोलनात मोठा सहभाग नोंदविला. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यासह उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकºयांनी नुकसानीचा विचार न करता दूधदर आंदोलनात कायदा हातात घेऊन सहभाग नोंदविल्यानेच सरकारला नमते घेत दुधाचा दर वाढवावा लागला आहे.