शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

रामराजे कॉलर उडवित नाहीत... प्रश्न सोडवितातर-घुनाथराजे नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:26 PM

‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही.

ठळक मुद्देउदयनराजेंचे नाव न घेता टीका, फलटणला शेतकरी व्यथा निवारण कक्षाचे उद्घाटन

फलटण : ‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. रामराजे कॉलर उडवत नसले तरी मातृभूमीची पाण्याची तहान त्यांनी भागविली आहे. आमच्या आजोबांनी जे संस्कार दिलेत व नेहमी दुसऱ्याचे दु:ख ओळखायला शिकण्याचे तत्त्व दिले आहे, त्याचे पालन रामराजेंनी केले आहे.’ असा टोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांना नाव न घेता लगावला.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रामराजे शेतकरी व्यथा निवारण कक्ष, योजना, आरोग्य विषयक कार्यक्रम आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने शेतकरी केंद्रबिंदू मानून सुरू असून, जिल्ह्यात आघाडीवर असलेली ही बाजार समिती येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रातही आघाडीवर असेल. शेतकºयांच्या हिताचा विचार करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समितीचे चेअरमन व संचालक दिवसरात्र प्रयत्नशील असून, नावीन्यपूर्ण योजना बाजार समितीने राबवित शेतकºयांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी अनेक योजना सुरू असतानाच त्यांचे आरोग्य, विजेच्या तक्रारी, महसूल विभागाकडील कामे, पोलीस आदी विभागातील प्रलंबित कामे सोडविण्यासाठी बाजार समिती आवर्जून लक्ष देत असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात दोन वर्षांत आघाडीवर असेल.’

या हंगामात ऊस जास्त असला तरी श्रीराम आणि शरयू कारखाना जास्तीत जास्त गाळप करून वेळेवर पेमेंट देईल. मात्र, स्वराज कारखान्याबद्दल आपण सांगू शकत नाही. त्यांचं काय चाललंय, हेच कळत नसल्याची टीका रामराजेंनी केली.रघुनाथराजे म्हणाले, ‘रामराजेंच्या माध्यमातूनच आम्ही बाजार समितीचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी हिताचा करीत आहे. बाजार समितीमार्फत लवकरच १२५ बेडचे हॉस्पिटल, शेतकºयांच्या मुलांना रोजगार, ८ नवीन पेट्रोल पंप, रुग्णवाहिका सेवा हे उपक्रम तातडीने शेतकºयांसाठी सुरू करणार आहोत. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी रुपयांच्या आसपास जाणार आहे.साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढूतालुक्यात उसाचे पीक वाढल्याने येत्या हंगामात संपूर्ण गाळपाची समस्या निर्माण होणार आहे. साखरवाडीचा कारखाना अडचणीत आहे. तो कारखाना लवकर अडचणीतून बाहेर यावा, यासाठी राजकारण न आणता आमचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात कारखानदारी टिकली पाहिजे. मात्र कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पैसेही वेळच्या वेळी देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आज श्रीराम कारखान्याने सर्वात अगोदर एकरकमी ऊस उत्पादकांचे पैसे देऊन आदर्श निर्माण केला आहे, असेही रामराजेंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण