शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

मधमाश्यांच्या हल्ल्यामागे खोडसाळपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:22 PM

दिलीप पाडळे । लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना ...

दिलीप पाडळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना अनेक घडल्या आहेत, याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शनिवारी पाचगणीच्या टेबललँडवर पर्यटकांवर मधमाश्यांनी पुन्हा हल्ला केला; पण स्थानिकांच्या मते एखादा खोडसाळ पर्यटक दगड मारत असल्यानेच असे हल्ले होत असावेत.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात घनदाट झाडी, खोल दरी यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोळ बसत असते. मधुमक्षिका पालन हाही येथील एक प्रमुख उद्योग बनला आहे. या परिस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. ही घटना अधिकच तीव्र झाल्याने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये. पाचगणी परिसरात टेबललँड, कड्या कपारीत व झाडे झुडपात अनेक ठिकाणी आगे मोहोळची पोळी आहेत. पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने मानवी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने भयमुक्त टेबललँड पॉर्इंट करण्याकरिता वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथे शेतात काम करण्यास गेलेल्या शांताराम रांजणे या शेतकऱ्यांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. यामध्ये या शेतकºयाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच रामवाडी, टोपेवाडी येथे रक्षाविसर्जन, अंत्यसंस्कारावेळी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लोकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता.सगळीकडे नवीन पानांफुलांचे प्रमाण जास्त आहे. या फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाश्या एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षित ठिकाण पाहून मधमाश्या मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाश्यांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये, अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माश्यांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी आपल्या सैनिकी माश्यांना देत. या माश्या फक्त हालचालींवर लक्ष ठेवून धोका संभावित असल्यास या माश्या आक्रमक होत तुटून पडतात. त्यानंतर कामगार माश्या त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, अशी माहिती वन्यजीव संशोधक अभ्यासक दीपक चिकने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सुगंध, तेलाच्या वासांनीही हल्लामधमाश्यांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशील असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माश्या विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाश्या अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.मधमाश्यांची सीमारेषा निश्चितमधमाश्या या संवेदनशील असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमारेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाश्या या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाश्या या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.धूर निघाल्यासमधमाश्यांच्या परिघात धूर झाल्यास त्या दिशेने धोक्याची तीव्रता ओळखून या माश्या अतिक्रमण करतात.काही मध व मधमाश्या खाणारे पक्षी पोळ्यास इजा पोहोचवतात. त्यामुळे आक्रमक झालेल्या मधमाश्या त्यावेळेस त्यांच्या समोर येणाºयावर हल्ला करतात.हल्ला झाला तर वेळीच काळजी घ्यावीआगी मोहोळच्या मधमाश्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांनी प्रथम माशी चावलेल्या ठिकाणची कूस (नांगी) काढावी. ज्या ठिकाणी आग होत आहे, त्याठिकाणी बर्फ लावावा म्हणजे आग शांत होते. जास्तच त्रास होत असल्यास डॉक्टरी उपचार द्यावेत.मधमाशी चावली असता जागेवर कोणतीही हालचाल न करता स्थब्ध उभे राहावे, तसेच मपलेर, टॉवेलनी तोंड झाकून घेणे. अन्यथा त्यांच्या एक किलोमीटरच्या परिक्षेत्रा बाहेर वाºयाच्या विरुद्ध दिशेने पाळावे. म्हणजे माश्या त्यांच्या परिक्षेत्राबाहेर येत नाहीत.