शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

पालिका शाळांना द्यायचीय खासगीला टक्कर!

By admin | Published: February 07, 2017 11:10 PM

पट वाढविण्यासाठी खटाटोप : ज्ञानरचनावादाचे गुरुजनांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण

सातारा : सातारा पालिकेच्या एकेकाळी ३५ शाळा होत्या. ही संख्या घटून निम्म्यावर आली असून, केवळ अठरा शाळा ज्ञानदान करत आहेत. तरीही पालिका प्रशासनाने हार मानलेली नाही. खासगी शिक्षण संस्थांना टक्कर देण्याची तयारी ठेवली असून, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ज्ञानरचनावादाचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सातारा तालुक्यातील कुमठे बीटमधील असंख्य शाळा ज्ञानरचनावादच्या यशस्वी प्रयोगासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या शाळेने सन २०१० मध्ये सुरू केलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे सातारा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढत आहे. राज्यभरातील अनेक शिक्षकांनी येथे भेटी देऊन आपापल्या शाळेत उपक्रम राबविला आहे. आता सातारा नगरपालिका शाळादेखील हा उपक्रम शाळेत राबविणार आहे. येथील शाळा क्रमांक एकमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.पालिका शाळांमध्ये पाठांतर पद्धत होती. आता विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढविण्यासाठी ज्ञानरचनावादातून शिकविण्याची तयारी नगरपालिका शिक्षण मंडळाने हाती घेतली आहे. या पद्धतीत शिकविण्यापेक्षा शिकण्यावर भर देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढणार आहे. शाळेची पटसंख्या वाढीसाठी हा प्रकल्प उपयोगी राहणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)सेमी इंग्रजीचाही पर्याय उपलब्ध दरम्यान, पालिकेच्या शाळांची पटसंख्या ही खासगी शाळांमुळे दरवर्षी कमी होत आहे. यासाठी खासगी शाळेच्या तुलनेने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व पालकांचा पालिका शाळेला बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी ज्ञानरचनावाद व सेमी इंग्रजी असे शाळेत शिकविण्याचे बदल केले आहेत, असे शिक्षण तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.