नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, सहसचिव विलासराव जाधव, संचालक विनायक विभूते, सलीम मुजावर, कॅप्टन बाबूराव कराळे, चंद्रकांत जाधव, दिलीप पाटील, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, प्रा. भगवान खोत, प्रा. महालिंग मुंढेकर, प्रा. रजनीश पिसे, रत्नाकर शानबाग, सुभेदार दिनकर मगरे, संतोष पवार, महेश भोसले, अरुणा जाधव, पाैर्णिमा जाधव, प्राजक्ता पालकर, सोनाली डवरी आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा शिंदे यांनी युद्ध स्मारकांचे महत्त्व सांगून ते नागरिकांना कायम प्रेरणादायी ठरतील, असे गौरवोद्गार काढले. नगराध्यक्षांच्या हस्ते दुशेरेच्या सरपंच सुमन जाधव, चित्रपट अभिनेत्री सिद्धी ढापरे, मिनल ढापरे, मुख्याधिकारी डाके यांच्या हस्ते तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, शेणोलीचे सरपंच विक्रम कणसे, लेफ्टनंट हर्षवर्धन मोहिते यांचा सत्कार झाला. प्राचार्य कणसे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे संरक्षणमंत्री म्हणून दिलेल्या योगदानाची माहिती दिली. प्राचार्य घाटगे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव जाधव यांनी आभार मानले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो : २१ केआरडी ०१
कॅप्शन : क-हाडात रणगाडा व विमानाच्या लोकार्पणाचा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, रमाकांत डाके, संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.