कोपर्डे हवेली : कोराेनाच्या काळात अनेकांना आधाराची, मदतीची गरज होती. हेच ओळखून यशवंतनगर येथील १९९६च्या बॅचमधील मदतीसाठी आणि आधारासाठी कोपर्डे हवेली येथील बाळासाहेब चव्हाण यांच्या शिवारात स्नेहमेळावा रंगला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी स्नेहमेळावा कोपर्डे हवेलीच्या शिवारात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे निमित्त असले तरी या तुकडीतील अनेक विद्यार्थी कोरोनाबाधित होऊन बरे झाले आहेत. त्यांना गरज होती ती आधाराची आणि मदतीची. अनेकांची कोरानामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. व्यवसाय अडचणीत आले होते. या कार्यक्रमात दहावीचे ३५ माजी विद्यार्थी सहभागी झाली होते. सुमारे एक लाख रूपये जमा करून या माजी विद्यार्थ्यांची मुले शिक्षण घेत असलेल्या गरीब होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पालकांकडे करण्यात आले. भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाली तर एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरले. यावेळी भूतकाळातल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन वर्तमान काळातील एकमेकांच्याविषयी माहिती घेतली. यावेळी अनेकांना आपुलकीची जाणीव झाल्याने गहिवरुन आले. यावेळी वाढत जाणारे वय आणि बदलते चेहरे ऐकमेकांचे लक्ष वेधून घेत होते.
या मेळाव्याला आण्णासाहेब कुंभार, डी. एस. शिरसाठ, आत्माराम आर्जुगडे, सर्जेराव जाधव उपस्थित होते.
फोटो ओळ
१० कोपर्डे हवेली-स्नेहमेळावा
कोपर्डे हवेली येथील शिवारात चक्क यशवंतराव चव्हाण विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला होता. (छाया : दीपक पवार)