सातारा : माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते - पाटील हे दोन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत. दोघांना प्रत्येकी सुमारे ३० कोटींचे कर्जही आहे.सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून नाईक - निंबाळकर यांची चर्चा असून, त्यांच्याकडे १ कोटी ४६ लाख रुपये किमतीची अलिशान गाडी आहे. नाईक - निंबाळकर यांच्या परिवाराकडे एकूण १६८ कोटींची संपत्ती आहे, तर धैर्यशील व त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण ४० कोटींची संपत्ती आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडे ६३ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नीच्या नावे २४ लाख ४९ हजार रुपयांची संपत्ती आहे. राम सातपुते यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असून, त्याची किंमत २ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे.
रणजितसिंह नाईक - निंबाळकर
- वय : ४७
- शिक्षण : बीए, शिवाजी विद्यापीठ
- रोख रक्कम : ९५ लाख ४६ हजार रुपये
- जंगम मालमत्ता : ११८ कोटी २५ लाख २१ हजार रुपये
- स्थावर मालमत्ता : ३ कोटी ५२ लाख ३५ हजार रुपये
- वाहने कोणकोणती : काही अलिशान गाड्या आहेत. त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
- कर्ज : विविध संस्थांचे ३० कोटी रुपयांचे कर्ज
- पत्नीच्या नावे काय ? : जंगम मालमत्ता : ३२ कोटी ९९ लाख ७१ हजार रुपये
- स्थावर मालमत्ता : १४ कोटी १२ लाख ६६ हजार रुपये
- कर्ज : १६ कोटी ७७ लाख ७८ हजार रुपये
- सोने : ७७ तोळे ज्याची किंमत ५२ लाख ५० हजार रुपये
धैर्यशील मोहिते - पाटील
- वय : ४७
- शिक्षण : एमबीए, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
- रोख रक्कम : ६४ हजार ९०७ रुपये
- जंगम मालमत्ता : १० कोटी २३ लाख ५ हजार रुपये
- स्थावर मालमत्ता : २ कोटी ४६ लाख ७७ हजार रुपये
- सोने : ७२४ ग्रॅम ज्याची किंमत ४८ लाख ८९ हजार रुपये
- कर्ज : ३१ कोटी ६ लाख ८३ हजार रुपये
- पत्नीच्या नावे काय ? : जंगम मालमत्ता : ६ कोटी १५ लाख रुपये ९९ हजार रुपये
- स्थावर मालमत्ता : २१ कोटी १७ लाख ८ हजार रुपये
- सोने : ८९८ ग्रॅम ज्याची किंमत ६० लाख ६७ हजार रुपये
- रोख रक्कम : २ लाख ९६ हजार रुपये