शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Satara: कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:41 PM

कोयनानगर : कोयना अभयारण्यात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा ...

कोयनानगर : कोयना अभयारण्यात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला. आजवर या संस्थेने अनेक दुर्मीळ वन्यजीव, घुबड, फुलपाखरांचा शोध लावला असून, त्यांच्या संशोधनाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.कोयना अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. यामध्ये अनेक दुर्मीळ प्राणी, पक्षी, वनस्पती वनौषधी प्रजाती असून त्याचा संशोधनातून उलगडा होत आहे. हा निसर्ग अभ्यासकांसाठी खजिना आहे. कोयना विभागात पर्यटनासोबत वन्यजीवांचे फोटोग्राफी, संशोधन, जैवविविधतेचा अभ्यास करणारी ‘डिस्कवर कोयना’ या संस्थेच्या सदस्यांना फोटोग्राफी करताना एक दुर्मीळ प्राणी कॅमेरात कैद झाला. संस्थेच्या सदस्यांनी कॅमेरामधील प्राण्याचे बारकाईने निरीक्षण केले असता. निसर्ग अभ्यास व अनुभवावरून हा पश्चिम घाटातच आढणारा ‘तपकिरी पाम सिवेट’ असल्याचे सिद्ध झाले.

आजवर गोव्यातील कॅसलरॉक ते कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील उंच पर्जन्यवनात हा प्राणी आढळतो, अशा लँडस्केपमध्ये टिकून राहण्याची त्याची क्षमता ही फळझाडांच्या प्रजातींच्या विविधतेवर अवलंबून असते. तपकिरी पाम सिवेट एकाकी व निशाचर असणारा प्राणी आहे. तो दिवसा झाडांच्या डोली, पोकळ्या, वेलीचे जाळे, शेकरूचे घरटे आणि फांद्यांच्या काट्यामध्ये आराम करत असतो. काही वेळा रात्री उघड्या फांद्यांत विश्रांती घेत असतो. प्रामुख्याने हा झाडाची फळे खाऊन जगणारा प्राणी आहे.हॉर्नबिल, मोठे कबुतर आदी पक्ष्याप्रमाणे फळाच्या बिया खाऊन त्याचे विष्ठेतून बीज उगवले जाते. त्याचप्रमाणे हा प्राणी निसर्ग संवर्धन वृक्षारोपणाचे महत्त्वपूर्ण कार्य करत असतो. काही ठिकाणी याचा अधिवास नष्ट झाल्यामुळे अथवा शिकारीमुळे जैवविविधतेवर परिणाम होतो. ‘तपकिरी पाम सिवेट’ हा विखुरणारा प्राणी असल्याने जैवविविधता संवर्धनासाठी निसर्गातील एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो.कोयना अभयारण्यामध्ये असणाऱ्या दुर्मीळ घटकावर संशोधन, अभ्यास होणे अपेक्षित आहे. यासाठी स्थानिक व्यक्ती व संस्थांना यामध्ये सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे मत डिस्कवर कोयना संस्थाचे महेश शेलार, संग्राम कांबळे व सागर जाधव यांनी व्यक्त केले.

सह्याद्री प्रकल्पामध्ये पुणे, मुंबईसह दूरवरचे अभ्यासक संशोधक विद्यार्थी व संस्था वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन व अभ्यासासाठी येत असतात, त्यांना या संशोधनात खरी मदत स्थानिक नागरिक व निसर्ग अभ्यासक संस्था करत असतात. अशा स्थानिक अभ्यासक व निसर्ग संस्थांना वन्यजीव विभागाने मार्गदर्शन करून त्यांच्यामार्फत नवनवीन संशोधन होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. -महेश शेलार, अभ्यासक, नवजा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल